लग्नाचा तगादा लावला अन् घात झाला! प्रेयसीचा काटा काढण्यासाठी प्रियकराने रचला थरारक कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 16:55 IST2026-02-01T16:54:52+5:302026-02-01T16:55:18+5:30

Crime News : लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने अत्यंत निर्दयीपणे काटा काढला.

The wedding was postponed and the attack took place! The lover hatched a thrilling plot to get rid of his girlfriend | लग्नाचा तगादा लावला अन् घात झाला! प्रेयसीचा काटा काढण्यासाठी प्रियकराने रचला थरारक कट

लग्नाचा तगादा लावला अन् घात झाला! प्रेयसीचा काटा काढण्यासाठी प्रियकराने रचला थरारक कट

प्रेम, लग्न आणि मग थेट हत्या... छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने अत्यंत निर्दयीपणे काटा काढला. ही घटना इतकी गुप्त होती की, दोन महिने कुणालाच याची पुसटशी कल्पनाही नव्हती. मात्र, निसर्गाच्या चक्रातून कोणीही सुटत नाही, दोन महिन्यांनंतर एका मानवी सांगाड्याने या क्रूर हत्येचा पर्दाफाश केला आहे.

तीन वर्षांचं प्रेम अन् एक खतरनाक प्लॅन 

२२ वर्षीय संगीता उसेन्डी आणि दिनेश दुग्गा यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संगीता लग्नासाठी दिनेशकडे सातत्याने मागणी करत होती. पण दिनेशच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. लग्नाचा तगादा टाळण्यासाठी त्याने संगीताला कायमचं संपवण्याचा कट रचला आणि यात आपल्या दोन मित्रांनाही सामील करून घेतले.

शेतात बोलावले अन् गळा आवळला... 

१६ नोव्हेंबर २०२५ रोजी दिनेशने संगीताला विश्वासात घेऊन भेटायला बोलावले. तिथे त्याचे समनदीप पन्ना आणि एक अल्पवयीन मित्र आधीच दबा धरून बसले होते. दिनेश तिला एका निर्जन शेतात घेऊन गेला. तिथे या तिघांनी मिळून संगीताचा गळा आवळला आणि तिचा जीव घेतला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह आणि मोबाईल फोन जवळच्याच झाडीत फेकून दिला आणि तिथून पळ काढला.

सांगाड्याने दिलेली साक्ष! 

२२ जानेवारी २०२६ रोजी रनोबाई उसेन्डी यांच्या शेतात काही गावकऱ्यांना एक मानवी सांगाडा दिसला. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून सांगाडा आणि काही अंतरावर असलेला मोबाईल जप्त केला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि कपड्यांच्या आधारे तो मृतदेह बेपत्ता असलेल्या संगीताचा असल्याचे निष्पन्न झाले.

मुंबईतून आवळल्या मुसक्या 

पोलीस तपासात संगीताच्या कॉल डिटेल्सवरून दिनेश दुग्गाचे नाव समोर आले. पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी दिनेशला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्या दोन्ही मित्रांनाही अटक केली. यातील एक अल्पवयीन आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन मुंबईत पळून आला होता, त्याला बोरीवली परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सध्या हे तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, एका निष्पाप तरुणीच्या हत्येच्या या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title : छत्तीसगढ़: शादी के दबाव में प्रेमी ने की प्रेमिका की हत्या, सनसनीखेज साजिश

Web Summary : छत्तीसगढ़ में शादी का दबाव डालने पर एक व्यक्ति ने अपने दोस्तों के साथ मिलकर अपनी प्रेमिका की हत्या कर दी। कंकाल मिलने तक अपराध महीनों तक छिपा रहा। पुलिस ने मुंबई से एक सहित तीनों को गिरफ्तार किया।

Web Title : Lover Kills Girlfriend Over Marriage Pressure in Chhattisgarh: Shocking Plot

Web Summary : In Chhattisgarh, a man murdered his girlfriend, who pressured him for marriage, with his friends. The crime remained hidden for months until a skeleton was found. Police arrested all three, including one from Mumbai.