अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, पण नवरी पुन्हा प्रेमात पडली! नवऱ्यासोबत काय केलं वाचाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:29 IST2025-09-04T14:26:18+5:302025-09-04T14:29:08+5:30
एका विवाहित महिलेने लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच आपल्या प्रियकरासोबत पळ काढला आहे.

अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, पण नवरी पुन्हा प्रेमात पडली! नवऱ्यासोबत काय केलं वाचाच...
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पल्हीपूर गावातील एका विवाहित महिलेने लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच आपल्या प्रियकरासोबत पळ काढला आहे. विशेष म्हणजे, या महिलेचं लग्न अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालं होतं. या घटनेमुळे पीडित पती आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
गाझीपूर जिल्ह्यातील पल्हीपूर गावातील सोनू राजभर यांचा विवाह १७ मे २०२५ रोजी बिरनो पोलीस स्टेशन परिसरातील बधुपूर गावातील गुडिया राजभर यांच्याशी झाला होता. लग्नानंतर दीड महिना हे जोडपं आनंदाने राहत होतं. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आणि पत्नीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोनू मुंबईला गेला. मात्र, सोनूच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी गुडिया त्याच गावातील रिंकू राजभर नावाच्या तरुणाच्या जवळ आली. या दोघांमध्ये फोनवर संभाषण आणि भेटीगाठी वाढल्या.
दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार
३० ऑगस्ट रोजी गुडिया घरातून सुमारे २ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने घेऊन आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा आरोपही कुटुंबाने केला आहे. कुटुंबीयांनी गुडियाचा शोध घेतला असता, जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ती स्कूटीवरून आपल्या प्रियकरासोबत कॅनॉल रोडच्या दिशेने जाताना दिसली.
या घटनेची माहिती मिळताच सोनू मुंबईहून तातडीने गावी परतला. त्याने बिरनो पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोनूने सांगितले की, 'मी तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तिच्यावर विश्वास ठेवून शहरात गेलो होतो, पण तिने माझ्या विश्वासाचा आणि आमच्या कुटुंबाच्या सन्मानाचा अपमान केला आहे.'
पोलीस तपास सुरू
या प्रकरणी पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. सध्या पीडित पती सोनू आणि त्याचे कुटुंब न्याय मिळावा यासाठी पोलिसांच्या मदतीची वाट पाहत आहेत.