वडिलांना संपवून ड्रममध्ये भरणाऱ्या मुलाने ४ महिन्यांपूर्वीही केला होता मोठा कांड! शेजाऱ्यांनी सांगितले अक्षतचे कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:41 IST2026-02-24T12:38:35+5:302026-02-24T12:41:16+5:30

ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, ज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वडील रात्रंदिवस राबत होते, त्याच मुलाने स्वतःच्या बापाचा जीव घेतला.

The son who killed his father and stuffed him in a drum had committed a major incident 4 months ago too! Neighbors told about Akshat's exploits | वडिलांना संपवून ड्रममध्ये भरणाऱ्या मुलाने ४ महिन्यांपूर्वीही केला होता मोठा कांड! शेजाऱ्यांनी सांगितले अक्षतचे कारनामे

वडिलांना संपवून ड्रममध्ये भरणाऱ्या मुलाने ४ महिन्यांपूर्वीही केला होता मोठा कांड! शेजाऱ्यांनी सांगितले अक्षतचे कारनामे

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, ज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वडील रात्रंदिवस राबत होते, त्याच मुलाने स्वतःच्या बापाचा जीव घेतला. इतकंच नाही तर हत्येनंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे आरीने तुकडे करून ते ड्रममध्ये लपवले. शिक्षणाचा दबाव आणि कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने संपूर्ण आशियाना परिसर हादरून गेला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

NEET परीक्षेत अपयश अन् संताप

मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय अक्षत प्रताप सिंह उर्फ राजा हा बी.कॉम करत होता. त्याचे वडील मानवेंद्र सिंह हे मोठे पॅथॉलॉजी व्यावसायिक होते आणि त्यांच्या दारूच्या दुकानांचाही व्यवसाय होता. मुलाने डॉक्टर व्हावे अशी मानवेंद्र यांची इच्छा होती. अक्षतने दोनदा 'नीट' परीक्षा दिली होती, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. २० फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजता याच अभ्यासाच्या कारणावरून पिता-पुत्रात कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात अक्षतने वडिलांच्याच लायसन्सधारी रायफलने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली.

मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले

वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर अक्षतने जे केलं ते ऐकून कोणाचेही हातपाय कापतील. त्याने वडिलांचा मृतदेह तिसऱ्या मजल्यावरून खाली आणला आणि आरीने शरीराचे तुकडे केले. हात आणि पाय त्याने सदरौना येथील जंगलात नेऊन फेकले, तर धड एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये भरून घरातच लपवून ठेवले. आपल्या १६ वर्षांच्या धाकट्या बहिणीलाही त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन चार दिवस घरात कोंडून ठेवले होते.

शेजाऱ्यांना संशय कसा आला?

अक्षतने सुरुवातीला वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार स्वतःच पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, त्याच्या वागण्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता असे दिसून आले की, १९ फेब्रुवारीला मानवेंद्र सिंह कारने घरात शिरले, पण त्यानंतर ते बाहेर पडलेच नाहीत. याउलट अक्षत कार घेऊन जंगलाच्या दिशेने जाताना दिसला. दरम्यान, बंद घरातून येणाऱ्या उग्र दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं आणि या भयंकर गुन्ह्याचा भांडाफोड झाला.

४ महिन्यांपूर्वीच दाखवली होती गुन्हेगारी प्रवृत्ती

तपासात असे समोर आले आहे की, अक्षतने ४ महिन्यांपूर्वी घरातून मौल्यवान दागिने चोरले होते. वडिलांनी कामवालीवर संशय घेऊन पोलिसांत तक्रारही केली होती, पण जेव्हा चोरी मुलानेच केल्याचे समजले, तेव्हा मुलावरील प्रेमापोटी मानवेंद्र यांनी तक्रार मागे घेतली. मात्र, त्याच मुलाने अखेर वडिलांचाच काळ बनण्याचे ठरवले. पोलिसांनी आरोपी अक्षतला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे त्याची लहान बहीण कमालीच्या दहशतीत आहे. तिचे समुपदेशन केले जात आहे.

Web Title : बेटे ने पिता को मार डाला, शव के टुकड़े किए; पड़ोसियों ने बताया पिछला अपराध।

Web Summary : लखनऊ में, एक बेटे ने पढ़ाई के दबाव में अपने पिता की हत्या कर दी, शरीर को टुकड़ों में काटकर एक ड्रम में छुपा दिया। उसने चार महीने पहले गहने भी चुराए थे, जिससे उसकी आपराधिक प्रवृत्ति का पता चलता है। पड़ोसियों को उसके व्यवहार और घर से आने वाली बदबू से संदेह हुआ, जिससे अपराध का खुलासा हुआ।

Web Title : Son kills father, dismembers body; earlier crime revealed by neighbors.

Web Summary : In Lucknow, a son murdered his father over academic pressure, chopped the body into pieces and hid them in a drum. He had stolen jewelry four months prior, showcasing a disturbing criminal tendency. Neighbors became suspicious due to his behavior and a foul odor emanating from the house, leading to the crime's exposure.