बेडरूममध्ये घुसला अन्..., सुरक्षा रक्षकाने युनिसेफ अधिकाऱ्यासोबत केले दुष्कर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:38 IST2022-06-09T16:25:05+5:302022-06-09T16:38:27+5:30
Rape Case : इस्लामाबादमध्ये कार्यरत असलेल्या युनिसेफच्या महिला अधिकाऱ्यावर त्याच्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार केला.

बेडरूममध्ये घुसला अन्..., सुरक्षा रक्षकाने युनिसेफ अधिकाऱ्यासोबत केले दुष्कर्म
पाकिस्तानमध्ये महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राजधानी इस्लामाबादमध्येही महिला सुरक्षित नाहीत. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) च्या एका अधिकाऱ्यावर तिच्याच सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच कहुटा येथे एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे.
इस्लामाबादमध्ये कार्यरत असलेल्या युनिसेफच्या महिला अधिकाऱ्यावर त्याच्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार केला. अधिकारी यांनी आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध आबपारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी 10 जानेवारीपासून पाकिस्तानात काम करत आहे. डॉनच्या वृत्तानुसार, एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, सुरक्षा रक्षक तिच्या बेडरूममध्ये घुसला आणि तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हा रक्षक 11 मार्चपासून युनिसेफ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी तैनात होता. घटनेनंतर तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तसेच बलात्काराची दुसरी घटना अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी मंगळवारी रात्री घरातून बेपत्ता झाल्याची माहिती कहुटा येथील पोलिसांना दिल्याने उघडकीस आली. एका बांधकाम सुरू असलेल्या घरात आरोपीने तिच्यावर दुष्कर्म केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.