राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:17 IST2025-06-23T20:14:17+5:302025-06-23T20:17:23+5:30

राजा आणि सोनम यांनी लग्नापूर्वी त्यांच्या आईच्या नावावर एक कंपनी सुरू केली होती आणि त्या कंपनीच्या खात्यात ७-८ लाख रुपये जमा केले होते.

The Raja money was used to plan his death! Sonam used the same money to open a new account before marriage | राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 

राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 

मध्य प्रदेशातील इंदूर शहराचे प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत आहेत. आता राजा रघुवंशी यांचा भाऊ विपिन यांनी एक नवीन आणि धक्कादायक दावा केला आहे. विपिन यांच्या म्हणण्यानुसार, राजा आणि सोनम यांनी लग्नापूर्वी त्यांच्या आईच्या नावावर एक कंपनी सुरू केली होती आणि त्या कंपनीच्या खात्यात ७-८ लाख रुपये जमा केले होते. या पैशांचा वापर राजाच्या हत्येसाठीच केला गेला असावा, असा विपिन यांचा दावा आहे. राज कुशवाहाने याच पैशांतून विकास, आकाश आणि आनंदला पैसे दिले असावेत, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

७ आरोपींना अटक, नार्को टेस्टची मागणी
राजा रघुवंशी यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. यात एका प्रॉपर्टी डीलरचा आणि एका चौकीदाराचाही समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांना शिलाँग येथे नेले आहे, जिथे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. इतर आरोपींची चौकशी सुरू आहे. राजाच्या कुटुंबीयांनी आता आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. यासाठी ते उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे राजाच्या कुटुंबीयांनी सांगितले.

खुनामागचे कारण अजूनही गुलदस्त्यात
नार्को टेस्टच्या मागणीदरम्यानच, राजाच्या मोठ्या भावाने विपिनने आशंका व्यक्त केली आहे की, सोनम आणि राजाने मिळून जी कंपनी सुरू केली होती, त्याच कंपनीच्या पैशांतून राजाची हत्या घडवून आणली असावी. सोनमने राजाची हत्या का केली, या प्रश्नाचे ठोस उत्तर अद्यापही कुटुंबीयांना मिळालेले नाही. दुसरीकडे, मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनम आणि राज यांच्यात प्रेमसंबंध होते आणि सोनम पतीच्या मृत्यूनंतर राजशी लग्न करू इच्छित होती. म्हणूनच दोघांनी मिळून राजाच्या हत्येचा कट रचला.

आठव्या आरोपीचा शोध सुरू
मेघालय पोलिसांनी सोनम आणि राज यांची चौकशी केली असून, त्यांची रिमांड वाढवण्याची मागणी केली नाही, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. यावरून पोलिसांनी सोनम आणि राज यांची चौकशी पूर्ण केली असावी, असे मानले जात आहे. तरीही, या प्रकरणात एकामागून एक नवीन नावे समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांत या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता आणखी एका आरोपीचे नाव समोर आले आहे. शिलाँग पोलीस देवास नाका येथील एका मल्टीमध्ये राहणाऱ्या फ्लॅट मालक लोकेंद्र तोमरच्या शोधात आहेत. सोनम पळून गेल्यानंतर ज्या फ्लॅटमध्ये थांबली होती, तो फ्लॅट याच मल्टीमध्ये आहे.

आठव्या आरोपीचे नाव कसे समोर आले?
शनिवारी या हत्याकांडातील एका प्रॉपर्टी ब्रोकरला आणि एका सिक्युरिटी गार्डला अटक करण्यात आली आहे. प्रॉपर्टी ब्रोकर सिलोम जेम्स याच्यावर आरोप आहे की, त्यानेच गार्ड बलवीरच्या मदतीने फ्लॅटमधून एक बॅग काढून ती जाळली होती. या बॅगमध्ये कथितरित्या राजाच्या मृत्यूचे पुरावे, पिस्तूल आणि सुमारे ५ लाख रुपये रोख होते. सिलोमने चौकशीत सांगितले की, हे सर्व त्याने फ्लॅट मालक लोकेंद्रच्या दबावाखाली केले. तसेच त्याने हेही सांगितले की, लोकेंद्रनेच बॅगमधून पिस्तूल आणि रोख रक्कम काढून घेतली होती. यामुळे या प्रकरणात लोकेंद्र तोमरची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: The Raja money was used to plan his death! Sonam used the same money to open a new account before marriage