वृद्धाच्या अंगावर अगोदर वाहन घातले, नंतर लोखंडी टॉमीने मारहाण; खुनाचा गुन्हा दाखल

By संदीप वानखेडे | Updated: December 6, 2022 13:11 IST2022-12-06T13:10:12+5:302022-12-06T13:11:32+5:30

वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू : देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर शिवरातील घटना

The old man was first driven over by a vehicle, then beaten with an iron tommy in deulgaon raja buldhana | वृद्धाच्या अंगावर अगोदर वाहन घातले, नंतर लोखंडी टॉमीने मारहाण; खुनाचा गुन्हा दाखल

वृद्धाच्या अंगावर अगोदर वाहन घातले, नंतर लोखंडी टॉमीने मारहाण; खुनाचा गुन्हा दाखल

देऊळगाव राजा (बुलढाणा) : शेतामधून ट्रक जाऊ देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ६० वर्षीय वृद्धाच्या अंगावरून वाहने नेले. त्यानंतर लोखंडी टॉमी व लाकडी काठ्यानी मारहाण केल्याची घटना ५ डिसेंबर रोजी  देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर शिवारात घडली. तेजराव गोविंद डोईफोडे असे मृतक वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

देऊळगाव राजा तालुक्यातील ग्राम सुलतानपूर शिवारामध्ये ५ डिसेंबर रोजी शेतामधून ट्रक घेऊन जाण्यावरून वाद झाला़ या वादातून तेजराव गोविंद डोईफोडे यांच्या अंगावर चार चाकी वाहन नेण्यात आले़ तसेच त्यांना लोखंडी टॉमी आणि लाठी काठीने मारहाण करण्यात आली़ या मध्ये तेजराव डोईफोडे यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी रावसाहेब तेजराव डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपी रंगनाथ पुंजाजी डोईफोडे, शिवाजी रंगनाथ डोईफोडे, नरेश रंगनाथ डोईफोडे रा़ सुलतानपूर ता़ देऊळगाव राजा यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत. 
 

Web Title: The old man was first driven over by a vehicle, then beaten with an iron tommy in deulgaon raja buldhana