3 मुलांची आई प्रियकरासोबत झाली सैराट, घरी परतली तेव्हा पतीने हत्या करून पुरला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:13 PM2022-08-07T19:13:01+5:302022-08-07T19:14:04+5:30

Murder Case : पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

The mother of 3 children went out with her boyfriend, when she returned home, her husband killed her and buried the body | 3 मुलांची आई प्रियकरासोबत झाली सैराट, घरी परतली तेव्हा पतीने हत्या करून पुरला मृतदेह

3 मुलांची आई प्रियकरासोबत झाली सैराट, घरी परतली तेव्हा पतीने हत्या करून पुरला मृतदेह

googlenewsNext

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एका महिलेची तिच्या पतीने हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह शेतात पुरला. ही महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. ती परत आल्यावर पतीने तिची हत्या केली. महिलेला तीन मुले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

जिल्ह्यातील साक्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुलांची आई प्रियकरासह पळून गेली होती. मग ती काही दिवसात परतली. महिला परतल्यानंतर गावात पंचायत आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये तिच्या सासरच्यांनी तिला स्वीकारले. यानंतर पतीने तिची हत्या करून मृतदेह जमिनीत गाडला आणि मुलांसह घरातून फरार झाला. महिलेला २ मुलगे आणि एक मुलगी आहे. एका मुलीचे लग्न झाले आहे. महिलेचे पतीसोबत संबंध चांगले नव्हते.

सासरच्या लोकांनी बहिणीचा गळा आवळून खून केल्याचे मृताच्या भावाने सांगितले. तेव्हापासून सर्वजण फरार आहेत. रात्री 11 वाजता गावच्या सरपंचाने सांगितले की, बहिणीचा मृतदेह घरापासून 2-3 किमी अंतरावर पडला आहे. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा मृतदेह मातीत पुरला होता, जो आज आम्ही बाहेर काढला आहे. अंगावर जखमा होत्या, मानेवर खुणा होत्या. डीएसपी पूर्व मनोज कुमार पांडे यांनी सांगितले की, ही बाब निदर्शनास आली आहे. तपास करून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांनी पंचायतीच्या माध्यमातून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. आम्ही तपास करत आहोत, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Web Title: The mother of 3 children went out with her boyfriend, when she returned home, her husband killed her and buried the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.