शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिल्व्हर ओक हल्ल्याआधी झाली होती मीटिंग, नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू; पोलिसांची कोर्टात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 15:59 IST

Gunratna Sadavarte : सिल्व्हर ओक हल्ल्याआधी मीटिंग झाली होती आणि नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. 

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी राहत्या घरातून गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले. सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली होती. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपत असून गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात झाली आहे. सिल्व्हर ओक हल्ल्याआधी मीटिंग झाली होती आणि नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. 

सरकारी वकील यांनी प्रदीप घरत यांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली आहे. यामध्ये आणखी चार जणांच्या कोठडीची मागणी केली आहे. यामध्ये एकजण पसार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सदावर्ते तपासाला सहकार्य करत नाहीत. सर्व अटक आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. यामध्ये जप्त केलेल्या काही मोबाईलमधून महत्त्वाचे पुरावे मिळाले आहे. चंद्रकांत सूर्यवंशीचा शोध सुरु आहे, असा युक्तिवाद केला. पोलिसांची कोर्टात अशी माहिती दिली की, हल्ल्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्व्हर ओक येथे हल्ला करण्याचे ठरले होते. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले होते. युट्युब चॅनलचे देखील पत्रकार होते. नागपूरमधून आलेला कॉलबाबत चौकशी सुरु आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयMumbaiमुंबईPoliceपोलिसadvocateवकिल