रात्री 11 वाजता लाईट गेली, हनिमूनला नववधुने केले हे भयानक कृत्य; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 21:04 IST2022-06-09T20:24:58+5:302022-06-09T21:04:12+5:30
Robbery Case : दोन दिवसांपासून शक्य तितक्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर मंगळवारी रिंकूने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

रात्री 11 वाजता लाईट गेली, हनिमूनला नववधुने केले हे भयानक कृत्य; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नववधूने अंधाराचा फायदा घेत रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला. हा प्रकार नवऱ्याला समजताच त्याला धक्का बसला. दोन दिवसांपासून शक्य तितक्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर मंगळवारी रिंकूने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर सायबर सेल आणि कुशीनगर पोलिसांनी वधूचा शोध सुरू केला आहे.
वास्तविक, शाहजहांपूरच्या पलिया दरोबस्त गावातील रहिवासी रमेश पाल सिंह यांनी त्यांचा मुलगा रिंकू सिंगचा विवाह कुशीनगर जिल्ह्यातील पतारबा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या काजलसोबत केला. 27 मे रोजी सर्वजण वरातीने तेथे गेले. 28 मे रोजी निघाल्यानंतर वधूला गावात आणण्यात आले. रात्री अकराच्या सुमारास वीज गेली. रिंकू जास्त उष्णतेमुळे गच्चीवर झोपायला गेला होता. अंधाराचा फायदा घेत नववधूने सोन्या-चांदीचे दागिने, 11 हजारांची रोकड, मोबाईल व इतर साहित्य घेऊन पळ काढला.
चहा चांगला नसल्याच्या वादातून कँटिनमधल्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वीज गेल्यानंतर रिंकू आपल्या खोलीत पोहोचला. तेव्हा, त्याला धक्काच बसला त्याची पत्नी बेपत्ता होती. त्याने घराची झडती घेतली. मात्र, काहीही सापडले नाही. मुख्य दरवाजाही उघडा होता. ज्याची माहिती इतर नातेवाईकांना देण्यात आली. बायकोच्या नंबरवर फोन केला तर मोबाईल बंद होता. सासरशी संपर्क साधला. त्यावरही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. दोन दिवसांपासून शक्य तितक्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर मंगळवारी रिंकूने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.