प्रेमसंबंध, बलात्कार, धमकी अन् कोणत्याही मुलासोबत बोलल्यास मारहाण; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 16:50 IST2022-04-25T16:37:24+5:302022-04-25T16:50:16+5:30

पीडितेने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.

The incident took place in Dombivali where a sports coach sexually assaulted his student | प्रेमसंबंध, बलात्कार, धमकी अन् कोणत्याही मुलासोबत बोलल्यास मारहाण; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

प्रेमसंबंध, बलात्कार, धमकी अन् कोणत्याही मुलासोबत बोलल्यास मारहाण; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

डोंबिवली- सुसंस्कृत डोंबिवलीत गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उजेडात आली आहे. क्रीडा प्रशिक्षकाने त्याच्याच विद्यार्थिनीवर अत्याचार करत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. पीडितेने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.

सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. रामेश्वर पाठक असा या नराधमाचे नाव आहे. डोंबिवलीत राहणारी २७ वर्षीय पीडित तरुणी २०१२ साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. यावेळी तिचा कोच असलेल्या रामेश्वर पाठक याने ता तरुणीसोबत ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले.

काही कालावधीनंतर  दुसऱ्या मुलांशी बोलते म्हणून रामेश्वर हा या तरुणीला मारहाण करू लागला. या तरुणीला रामेश्वर याने १८ मार्च २०२२ रोजी डोंबिवलीत रॉडने अमानुष मारहाण केली. ज्यामध्ये या तरुणीचा पाय फ्रॅक्चर झाला. आरोपी इतक्यावरच न थांबता त्याने या तरुणीवर अत्याचारही केला. तसेच तुझे अर्धनग्न फोटो माझ्याकडे असून ते व्हायरल करेन, अशी धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं. 

अखेर या तरुणीने एका सहकाऱ्याच्या मदतीने मानपाडा पोलीस ठाण्यात येऊन याबाबतची तक्रार दिली. यानंतर मानपाडा पोलिसांनी रामेश्वर पाठक याच्याविरोधात बलात्कार, गंभीर मारहाण यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.

Web Title: The incident took place in Dombivali where a sports coach sexually assaulted his student