धक्कादायक! हॉटेलमध्ये आढळला IIT तरुणीचा मृतदेह; मध्यरात्री मित्रांसोबत आली अन् नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:23 IST2024-01-03T13:20:30+5:302024-01-03T13:23:18+5:30
तरुणी आणि आयआयटीतील अन्य तीन विद्यार्थी नववर्षानिमित्त जल्लोष करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी आयआयटीपासून २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका ठिकाणी गेले होते.

धक्कादायक! हॉटेलमध्ये आढळला IIT तरुणीचा मृतदेह; मध्यरात्री मित्रांसोबत आली अन् नंतर...
IIT Student Death ( Marathi News ) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-गुवाहाटी (IIT) इथं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीचा आसाममधील हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आला आहे. मंगळवारी ही घटना उघड झाली असून उच्चशिक्षित तरुणीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी आणि आयआयटीतील अन्य तीन विद्यार्थी नववर्षानिमित्त जल्लोष करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी आयआयटीपासून २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका ठिकाणी गेले होते. त्यांनी एका हॉटेलच्या दोन खोल्या बुक केल्या होत्या. मध्यरात्री चेक-इनसाठी ते हॉटेलमध्ये पोहोचले होते. मात्र यावेळी ते सर्वजण नशेत असल्याचं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
मध्यरात्री चेक इन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र या चार जणांपैकी एक तरुणी बेशुद्धावस्थेत आढळली. तिला तातडीने गुवाहाटी येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.
दरम्यान, याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.