पतीने दुसरं लग्न करून आणली सवत, बातमी समजताच पत्नीचा राग अनावर, त्यानंतर पतीची झाली चपलानी धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 20:19 IST2022-06-01T20:18:30+5:302022-06-01T20:19:03+5:30
Crime News: पश्चिम बंगालमधील कालना परिसरामध्ये एका व्यक्तीला पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. पती दुसरं लग्न करून घरी आला आहे, ही गोष्ट पहिल्या पत्नीला समजताच तिने पतीची चारचौघांमध्ये चपलाने चांगलीच धुलाई केली.

पतीने दुसरं लग्न करून आणली सवत, बातमी समजताच पत्नीचा राग अनावर, त्यानंतर पतीची झाली चपलानी धुलाई
कोलकाता - पश्चिम बंगालमधील कालना परिसरामध्ये एका व्यक्तीला पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. पती दुसरं लग्न करून घरी आला आहे, ही गोष्ट पहिल्या पत्नीला समजताच तिने पतीची चारचौघांमध्ये चपलाने चांगलीच धुलाई केली. दरम्यान, पती-पत्नीमधील वादानंतर रंगलेलं हे नाटक लोक मात्र बघ्याच्या भूमिकेतून बघत होते.
ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कालना येथे घडली आहे. त्याची पहिली पत्नी सपना हिने केलेल्या दाव्यानुसार विवाहित असतानाही तिचा पती सोमनाथ याने दोन मुलांना सोडून मुंबईत गुपचूप दुसरं लग्न केलं. आमच्याकडे खाण्यापिण्यासाठीही पैसे नाहीत. अशा परिस्थितीत आम्हाला मदत करण्याऐवजी तो दुसऱ्या पत्नीसोबत मौजमजा करत आहे.
सपनाने सांगितले की, दुसरे लग्न केल्यानंतर सोमनाथने आमची काहीच खबर घेतली नाही. एवढंच नाही तर त्याने कुणालाही याबाबत काही सांगितलं नाही. घरामध्ये खाण्यापिण्याची खूप टंचाई आहे. कुटुंबीयांनी सोमनाथ याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. दरम्यान सोमनाथ आला आहे हे समजल्यावर सपनाने सगळा राग त्याच्यावर काढला. तिने सर्वांसमक्ष सोमनाथची चपलांनी धुलाई केली. यामध्ये तिच्या कुटुंबीयांनीही त्याची धुलाई केली.
या घटनेची आसपासच्या परिसरामध्ये खूप चर्चा होत आहे. या प्रकरणी आता स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये कुठलीही लेखी तक्रार करण्यात आलेली नाही.