आईच्या अनैतिक संबंधास मुलीने केला विरोध, प्रियकराला बोलावून घडवून आणला गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 18:32 IST2022-06-16T18:31:40+5:302022-06-16T18:32:19+5:30
Gangrape Case : ही घटना बलरामपूरच्या हरैय्या पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या ठिकाणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईसोबत राहत होती.

आईच्या अनैतिक संबंधास मुलीने केला विरोध, प्रियकराला बोलावून घडवून आणला गँगरेप
उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्काराची अशी घृणास्पद घटना घडली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, तिच्या आईच्या प्रियकराने त्याच्या मित्रांसह घरात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. इतकेच नाही तर यामध्ये तिच्या आईनेही तिच्या प्रियकराला साथ दिल्याचे पीडितेने म्हटले आहे.
ही घटना बलरामपूरच्या हरैय्या पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या ठिकाणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईसोबत राहत होती. मुलीचा आरोप आहे की, तिच्या आईचे संतोष कुमारसोबत अनैतिक संबंध आहेत. त्या दोघांनाही त्याने अनेकदा आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते.
पीडितेने सांगितले की, जेव्हाही तिने विरोध केला तेव्हा तिला धमकावले आणि मारहाण करून तिचे तोंड बंद केले. घटनेची माहिती देताना पीडितेने सांगितले की, 20 मे रोजी तिच्या आईचा प्रियकर संतोष इतर दोन लोकांसह तिच्या घरी पोहोचला. पुढे या अल्पवयीन मुलीने सांगितले की, ते आल्यावर आईने तिला चहा बनवण्यास सांगितले, ती चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा आईने घराबाहेर जाऊन दरवाजा बंद केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर घरात उपस्थित संतोष, आकाश आणि कन्हैलाल नावाच्या आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडितेने असेही सांगितले आहे की, तिघेही घरातून बाहेर पडले तेव्हा तिच्या आईने आरोपींपैकी एक आरोपी आकाशसोबत तिचे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले. काही दिवसांनी पीडितेने या प्रकरणाची माहिती तिच्या काकीला दिली, त्यानंतर 25 मे रोजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस ठाण्यात तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने पीडितेने ३१ मे रोजी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली. मात्र, घटनेला 17 दिवस उलटूनही पीडितेला दोषींवर कारवाईसाठी पायऱ्या झिझवाव्या लागत आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर आता पोलीस तपासानंतर कारवाई करण्याचा दावा करत आहेत.