जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:59 IST2025-06-13T18:58:28+5:302025-06-13T18:59:36+5:30
घटनेनंतर आरोपी वडील दिलीप पंडित फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका वडिलांनी आपल्या तीन महिन्यांच्या जुळ्या मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात तीन महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, तिचा तीन महिन्यांचा भाऊ कार्तिक गंभीर अवस्थेत रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना जिल्ह्यातील कुधनी पोलीस स्टेशन परिसरातील माधोपूर चिकणी गावात घडली आहे.
निष्पाप मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला
माधोपूर चिकणी गावातील रहिवासी दिलीप पंडित यांचा बुधवारी रात्री (१२ जून २०२५) त्यांच्या पत्नीसोबत शुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दिलीप पंडितने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. संतापाच्या भरात त्याने आपल्या दोन निष्पाप मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात त्याची तीन महिन्यांची मुलगी जागीच मरण पावली. तर, त्याचा दुसरा तीन महिन्यांचा मुलगा कार्तिक गंभीर जखमी झाला. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
आरोपी वडील फरार
घटनेनंतर आरोपी वडील दिलीप पंडित फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. एसपी विद्यासागर यांनी घटनेची पुष्टी केली आहे. "एका वडिलांनी आपल्या तीन महिन्यांच्या मुलीची हत्या केली आहे. दुसरा मुलगाही तीन महिन्यांचा असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत," असे एसपी विद्यासागर यांनी सांगितले. कुधनी पोलीस ठाण्याचे प्रभारी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास करत आहेत.
आरोपीच्या आजीने सांगितले की, पती-पत्नीमध्ये नेमके काय घडले, हे त्यांना माहिती नाही. दिलीप बुधवारी बाजारातून परतला तेव्हा तो खूप रागात होता. विशेष म्हणजे, मुलांच्या आईने या घटनेबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला आणि 'काहीही झाले नाही' असे म्हटले.