शिर कापलेला मृतदेह, हातावर टॅटू... अवैध संबंधातून झालेल्या हत्येची थरकाप उडवणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:54 IST2022-04-22T18:32:48+5:302022-04-22T18:54:47+5:30
Murder Case :पोलिसांनी प्रथम तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर खुनाच्या आरोपाखाली महिलेच्या पतीला अटक करण्यात आली, त्यानंतर हत्येचे गूढ उकलले.

शिर कापलेला मृतदेह, हातावर टॅटू... अवैध संबंधातून झालेल्या हत्येची थरकाप उडवणारी गोष्ट
बिहारच्या भागलपूरमध्ये अवैध संबंधांप्रकरणी एक भयंकर हत्येचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेची सुरुवात होळीच्या दिवशी महिलेचे शिर कापून झाली. मात्र, पोलीस तपासात खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी प्रथम तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर खुनाच्या आरोपाखाली महिलेच्या पतीला अटक करण्यात आली, त्यानंतर हत्येचे गूढ उकलले.
अवैध संबंधांमध्ये अडकलेल्या या कथेचे दुवे पोलीस जोडू लागले, जेव्हा पोलीस तपासात असे समोर आले की, आरोपी पतीला आपल्या पत्नीवर बऱ्याच दिवसांपासून संशय होता की, आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्याने मित्रांची मदत घेतली आणि पाच मित्रांसह पत्नीचा गळा चिरून खून केला. बुधवारी पोलिसांनी पतीसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. अन्य दोघांना अटक करण्यासाठी पोलिस छापे टाकत आहेत.
होळीच्या दिवशी भोरंगजवळ एका अज्ञात महिलेचा शिर कापल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन दिवसांनी महिलेचे शिरही शोधण्यात आले. महिलेची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले होते. या प्रकरणी कहालगाव एसडीपीओ शिवानंद सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या हातावर नवीनच्या नावाचा टॅटू आहे. त्या टॅटूच्या आधारे पोलिसांनी शिरच्छेद केलेल्या महिलेची ओळख पटवली. ही महिला बुधूचक पोलिस स्टेशन परिसरात राहणारे नवीन मंडल यांची पत्नी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांनी नवीनचा शोध सुरू केला. पोलिसांनी नवीनला अटक केली आणि घटनास्थळीच त्याचे सहकारी नारद पंडित, पटवारी मंडल आणि भुवनेश्वर मंडल यांना त्यांच्या घरातून अटक केली. कहालगाव एसडीपीओ यांनी सांगितले की, पती नवीन मंडल याने पत्नीच्या हत्येची बाब कबुल केली आहे. नवीनने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, त्याच्या पत्नीचे गावातील अन्य एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते, त्यामुळे तो नाराज होता. या प्रकरणावर गावात सतत टोमणे ऐकू येत होते, त्यामुळे त्याने आपल्या मित्रांसह त्याची हत्या केली.