समोर सोफ्यावर बसले अन् अचानक केली फायरिंग,समोर आले सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येचे CCTV फुटेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 17:34 IST2023-12-05T17:33:46+5:302023-12-05T17:34:51+5:30
ही घटना सुखदेव यांच्या श्यामनगर येथील घरात घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे...

समोर सोफ्यावर बसले अन् अचानक केली फायरिंग,समोर आले सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येचे CCTV फुटेज
राजस्थानातील जयपूरमध्ये राजपूत करनी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक हल्लेखोरही मारला गेला आहे. गोगामेडी, त्यांच्या एका सुरक्षा रक्षक आणि हल्लेखोरासह 4 जणांना गोळी लागली आहे. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला अससून, सुखदेव गोगामेडी यांच्या सुरक्षा रक्षकाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना सुखदेव यांच्या श्यामनगर येथील घरात घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
जयपूरचे पोलीस आयुक्त बीजू जॉर्ज जोसेफ यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, 'येथे तीन लोक आले आणि त्यांनी सुखदेव यांच्या कर्मचाऱ्यांकडे गोगामेडी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर गोगामेडी यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना (सुखदेव गोगामेडी) विचारले. याला त्यांनी परवानगी दिली. यानंतर, ते तिघेही आत गेले. तेथे त्याच्यात सुमारे 10 मिनिटे चर्चा झाली. यानंतर गोळीबार झाला ज्यात सुखदेव गोगामेडी यांचा मृत्यू झाला. शेजारी उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकालाही गोळी लागली आहे. त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे."
क्रॉसफायरिंगमध्ये हल्लेखोराचाही मृत्यू -
जोसेफ म्हणाले, यावेळी झालेल्या क्रॉसफायरिंगमध्ये तीन तीन हल्लेखोरांपैकी एकाचा मृत्यूही झाला आहे. नवीन सिंह शेखावत असे त्या हल्लेखोराचे नाव आहे. तो मुळचा शापुरा येथील रहिवासी होता. तो जयपूरमध्ये कपड्याचे दुकान चालवत होता. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्म घटना कैद झाली आहे. हल्लेखोराची ओळक पटवली जात आहे. लवकरच हल्लेखोर पकडले जातील. तसेच घटनेच्या मुळाशी जे लोक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचले जाईल. यातच, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रोहित गोदाराने सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
#WATCH | Rajasthan | Sukhdev Singh Gogamedi, national president of Rashtriya Rajput Karni Sena, was shot dead by unidentified bike-borne criminals in Jaipur, earlier today.
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 5, 2023
(CCTV visuals, confirmed by Police) pic.twitter.com/m0oCMcMW4S
स्कॉर्पिओमध्ये आले अन् स्कूटीवरून पळाले -
पोलीस आयुक्त म्हणाले, हल्लेखोर स्कॉर्पिओने आले होते. मात्र गाडी चालवणाऱ्या नवीनचा मृत्यू झाल्याने त्यांना त्या गाडीतून पळून जाता आले नाही. त्यांनी एक स्कुटी हिसकावत त्यावरून पळ काढला.