लग्नाच्या 1 महिन्यानंतरच सासरी नववधूचा जळालेला मृतदेह आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 20:42 IST2022-06-14T20:37:23+5:302022-06-14T20:42:22+5:30
Dowry Case :5 दिवसांपूर्वी कोटा पोलिसांना आगीमुळे घरातील नवविवाहित महिला जळून खाक झाल्याची माहिती मिळाली होती.

लग्नाच्या 1 महिन्यानंतरच सासरी नववधूचा जळालेला मृतदेह आढळला
बिलासपूर : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील कोटा गावातील कारगीकला येथे एका नवविवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ केल्याची घटना समोर आली आहे. हुंड्याची मागणी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्यांसह अन्य ३ जणांना अटक केली आहे. एका महिन्यापूर्वी नगीता उर्फ श्वेता साहू हिचे लग्न झाले होते. लग्नानंतर मोटारसायकल दिली नाही म्हणून सासरचे लोक तिला फटकारायचे. 5 दिवसांपूर्वी कोटा पोलिसांना आगीमुळे घरातील नवविवाहित महिला जळून खाक झाल्याची माहिती मिळाली होती.
या प्रकरणी माहेरच्या लोकांनी श्वेताच्या हत्येचा आरोप केला. घटनास्थळी पोहोचलेल्या कोटा पोलिसांनी श्वेताचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह घरातून बाहेर काढला. यासोबत रॉकेल तेल आणि माचिसही जप्त करून कारवाई सुरू करण्यात आली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. एएसपी ग्रामीण रोहित झा आणि कोटा स्टेशन प्रभारी दिनेश चंद्र यांना एसएसपी पारुल माथूर यांनी तपास करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. चौकशीअंती समोर आले की, लग्नानंतर मोटारसायकल आणली नाही म्हणून तिचा पती, सासू आणि घरातील इतर लोक तिला सतत त्रास देत होते.
नवरा नवरी थोडक्यात बचावले, लग्नादरम्यान बाल्कनी कोसळल्याने झाले 12 जण जखमी
टोमणे मारत होते
रोजच्या टोमणेला कंटाळून नगीता उर्फ श्वेताने घरात ठेवलेले रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेच्या तपासात आत्तापर्यंत कोटा पोलीस ठाण्यात मृताचा पती नोहर साहू, सासरा लेधू राम, सासू सतीनीबाई आणि अन्य दोघांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मृतकाच्या माहेरच्या मंडळींसह सासरच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.