भाई लोकांची पोलिसांनी जिरवली, ड्या घालून परिसरात काढली वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 09:27 IST2022-05-25T09:26:58+5:302022-05-25T09:27:17+5:30

कल्याणमध्ये बेड्या घालून परिसरात काढली वरात

The brothers were arrested by the police | भाई लोकांची पोलिसांनी जिरवली, ड्या घालून परिसरात काढली वरात

भाई लोकांची पोलिसांनी जिरवली, ड्या घालून परिसरात काढली वरात

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : सराईत गुन्हेगारांचा माज उतरविण्यासाठी पोलिसांनी आधी मकोका लावला, नंतर ज्या भागात त्यांची दहशत होती, त्याच भागातून बेड्या घालून त्यांची वरात काढण्यात आली. स्थानिकांमध्ये पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक  होत आहे. कल्याणमध्ये पोलिसांचा गुंडांमध्ये असलेला धाक यानिमित्ताने पाहावयास मिळाला.

कल्याण, डोंबिवलीत गेल्या काही दिवसांत स्थानिक गावगुंडांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री दारू पिऊन धिंगाणा घालणे, वाहनांची तोडफोड करणे, मारहाण करणे, सर्वसामान्यांमध्ये दहशत करण्यासाठी काेणत्याही थराला जाणे, असे प्रकार गुंडांनी सुरू केले होते. सहपोलीस  आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कल्याण, डोंबिवलीतील या गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी धडक कारवाई सुरू केली. 

 कोळसेवाडी पोलिसांनी आधी एमपीडीएअंतर्गत कारवाई करीत अनेक गुंडांना तुरुंगात पाठविले. त्यापेक्षा जास्त सराईत असलेल्या १२ गुंडांना मकोका लावण्यात आला. कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या आदेशानंतर कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली भागात मकोका लावण्यात आलेल्या १२ आरोपींना पोलिसांनी बेड्या घालून गल्लीगल्लीत फिरविले. हातात बेड्या, माना खाली आणि मागे पोलीस, असे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले. ज्या भागात या भाई लोकांची दहशत होती, त्याच भागात त्यांना फिरवून पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे.

Web Title: The brothers were arrested by the police