विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्री घरी पोहोचला, घरच्यांनी दिली 'तालिबानी' शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 21:45 IST2022-07-11T21:43:27+5:302022-07-11T21:45:50+5:30
Assaulting Case : यासोबतच त्याला तालिबानीपणे दोरीने बांधले. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला.

विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्री घरी पोहोचला, घरच्यांनी दिली 'तालिबानी' शिक्षा
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात एका प्रेमीयुगुलाला ओलीस ठेवून क्रूरपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक तालिबानीपणे तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. याशिवाय कुटुंबीयांनी विवाहित प्रेयसीला बेदम मारहाण करून गावात फिरवले, याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी कारवाई करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिलीभीतमध्ये राहणारा एक तरुण रात्री त्याच्या विवाहित मैत्रिणीच्या घरी पोहोचला. दरम्यान, घरातील लोक जागे झाले आणि त्यांनी त्यांना पकडून तरुणाला बेदम मारहाण केली. यासोबतच त्याला तालिबानीपणे दोरीने बांधले. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला.
याशिवाय कुटुंबीयांनीही विवाहितेला चप्पलने मारहाण करत गावभर फिरवले. कोणीतरी प्रियकर आणि प्रेयसीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना २ जुलैची आहे.
सध्या पोलीस याप्रकरणी कारवाई करत आहेत. एएसपी संजीव बाजपेयी सांगतात की, ही घटना खुदागंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. बिलसांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलीभीत येथून २ जुलैच्या रात्री एक व्यक्ती पोहोचली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.