शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

पोलीस दलात खळबळ! प्रशिक्षणाला गेलेले पोलीस पुण्याहून कोरोना घेऊन परतले; ३३ पैकी १२ पॉजिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 7:03 PM

Corona Positive Found in Police :प्रशिक्षणप्राप्त १२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्याने शहर पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे प्रशिक्षणाला गेलेल्या ३३ ही जणांची तपासणी करून घेण्यात आली. त्यांच्यातील १२ जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

नागपूर - गुप्तवार्ता विभागाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेलेले नगापुरातील अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाची बाधा घेऊन परतले आहे. प्रशिक्षणप्राप्त १२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्याने शहर पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

गुप्तवार्ता (खुपिया) विभागात काम करणाऱ्या पोलिसांसाठी पुण्यात एसआरपीएफ, एमआयए तर्फे ३० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नागपुरातील ३३ महिला-पुरूष पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. २९ ऑगस्टला ते पुण्यात गेले. प्रशिक्षण ऑटोपून १० सप्टेंबरला ते परत आले. त्यातील काही जणांना शनिवारी दुपारपासून सर्दी पडसा आणि कणकण वाटू लागली. त्यामुळे काहींनी सुटीसाठी आपल्या वरिष्ठांकडे विचारणा केली. मात्र, गणेशोत्सव बंदोबस्तामुळे ठोस कारणाशिवाय सुट्या देणे बंद असल्याने वरिष्ठांनी पोलीस हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क करण्याचा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना सल्ला दिला. या पार्श्वभूमीवर, शनिवारी काही पोलिसांची आरटीपीसीआर करून घेण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाचे लक्षण आढळले. पोलीस हॉस्पिटलचे डॉ. संदीप शिंदे यांनी ही बाब पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर प्रशिक्षणाला गेलेल्या ३३ ही जणांची तपासणी करून घेण्यात आली. त्यांच्यातील १२ जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या सर्वांना क्वॉरेन्टाईन करण्यात आले असून, ईतरांना गृह विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांवरही लक्ष ठेवण्यात आले आहे. 

लसीकरण झाले होतेबाधित आढळलेल्या १२ जणांमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून, या सर्वच्या सर्व १२ ही जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोज घेतले आहे, हे विशेष. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसnagpurनागपूरPuneपुणे