शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दहा वर्षांची सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 1:24 PM

आई-वडिलांनी वेगळे राहण्यास सांगितल्यामुळे मिथुन हा रोज दारू पिऊन घरी येत असे.

पुणे :  क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला १० वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंडाची विशेष न्यायाधिश आर. व्ही. आदोणे यांनी सुनाविली. मिथुन तानाजी मोरे (वय २३) असे शिक्षा सुनाविण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. मयूरी मिथुन मोरे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. १४ मार्च २०१२ रोजी ही घटना घडली.  मिथुनच्या आई-वडिलांना वेगळे राहण्यास सांगितल्याने मिथुन आणि मयुरी यांनी स्वतंत्र संसार थाटला होता. आई-वडिलांनी वेगळे राहण्यास सांगितल्यामुळे मिथुन हा रोज दारू पिऊन घरी येत असे. मयुरी ही सहा महिन्यांची गरोदर होती. घटनेच्या दिवशी तीने मिथून याला जन्माला येणा-या बाळाचा विचार करून दारू न पिण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मिथुन याने गमतीने मयुरीला त्याला मारण्यास सांगितले. त्यानुसार मयुरीने त्याच्या गालावर हलकी चापट मारली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याने मयुरीला बेदम मारहाण केली.  त्यावेळी तू माहेरी निघून जा मी तुला नांदवणार नाही, असे मिथुनने तिला सांगितले. मात्र, मयूरीने माहेरी जाण्यास नकार देत मी आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. मयूरीने घरातील रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. खटल्यामध्ये त्यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये तपासी अधिकारी, मृत्युपूर्वी साक्ष नोंदवणारे नायब तहसीलदार, तक्रारदार यांची साक्ष महत्वाची ठरली. खटला गंभीर असून, घटनेच्या दिवशी मयूरी या सहा महिन्यांच्या गरोदर होत्या, असा युक्तिवाद अ‍ॅड. पाठक यांनी केली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साधी कैद भोगावी लागले, असे निकालात नमूद आहे. न्यायालयीन कामकाजामध्ये पोलीस कर्मचारी आर. एन. नागवडे यांनी मदत केली. पैरवी अधिकारी म्हणून कुंभार यांनी काम पाहिले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस