कोंबडी घेऊन जाणाऱ्या टेम्पोची दुचाकी गाडीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 21:18 IST2022-02-02T21:17:58+5:302022-02-02T21:18:55+5:30
Accident Case :रान गावमधील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

कोंबडी घेऊन जाणाऱ्या टेम्पोची दुचाकी गाडीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
आशिष राणे
वसई :- भरघाव वेगात कोंबडी घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकांने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना वसई पश्चिमेतील रानगाव गावात बुधवारी भल्या पहाटे घडली आहे.
या भीषण अपघाताचा थरार रस्त्यावरील एका सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाल्याने हा भीषण अपघात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. नारायण मेहेर वय ५४ हयांचा जागीच मृत्यू झाला असून परेश मेहेर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नारायण व परेश हे दोघेही जण बुधवारी सकाळी दुचाकी वरून जाताना समोरून भरघाव वेगात आलेल्या टेम्पोने या दुचाकीला जोरदार धडक दिली असता दुचाकी वरील नारायण मेहेर यांचा जागीच मृत्यू झाला तर परेश मेहेर याने हेल्मेट घातल्याने त्याचा जीव वाचला मात्र तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यू झालेले नारायण मेहेर वय ५४ रा. रानगाव हे वसईतील वर्तक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिपाई होते तर गंभीर जखमी झालेले परेश मेहेर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत आहेत.