The teacher has beaten the students until they break their teeth | धक्कादायक! विद्यार्थ्यांचा दात तुटेपर्यंत शिक्षकाने केली मारहाण  
धक्कादायक! विद्यार्थ्यांचा दात तुटेपर्यंत शिक्षकाने केली मारहाण  

ठळक मुद्देशिक्षकाने विद्यार्थ्यांला छडी मारल्याने तो जमिनीवर पडल्यामुळे त्याचा दात तुटल्याची घटना गुरुवारी सकाळी शाळेत घडलीसाडे आठच्या दरम्यान पीटी तासादरम्यान परेड सुरू असताना हिरा सिंग या शिक्षकाने पाठीमागून लाकडी छडी मारली

नालासोपारा - औरंगाबादमधील शिक्षकाने विद्यार्थाला केलेली मारहाणीची घटना ताजी असतानाच नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग परिसरातील एका शाळेमधील शिक्षकाने विद्यार्थ्यांला छडी मारल्याने तो जमिनीवर पडल्यामुळे त्याचा दात तुटल्याची घटना गुरुवारी सकाळी शाळेत घडली आहे. मुलाच्या आईने शिक्षकाविरोधात वालीव पोलीस ठाण्यात जाऊन सोमवारी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. 

नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग परिसरातील जाधवपाडा येथे एम. ई. टी. हायस्कुलमध्ये साडी कंपाउंडजवळील न्यू गॅलॅक्सि चाळीत राहणारा व सहावी इयत्तेत शिकणारा रोशन कुमार सुधीर झा (12) गुरुवारी 11 जुलै 2019 ला सकाळी शाळेत गेला होता. साडे आठच्या दरम्यान पीटी तासादरम्यान परेड सुरू असताना हिरा सिंग या शिक्षकाने पाठीमागून लाकडी छडी मारल्याने रोशन जमिनीवर पडल्याने त्याच्या दाताला दुखापत झाल्याने दात तुटला आहे.


Web Title: The teacher has beaten the students until they break their teeth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.