The taxi driver arrested who was doing objectionable shooting of neighboring women | शेजारच्या महिलेचे अश्लील चित्रिकरण करणाऱ्या टॅक्सीचालकाच्या पोलिसांना आवळल्या मुसक्या
शेजारच्या महिलेचे अश्लील चित्रिकरण करणाऱ्या टॅक्सीचालकाच्या पोलिसांना आवळल्या मुसक्या

ठळक मुद्दे याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली पुढील तांत्रिक तपासासाठी आरोपीचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. 

मुंबई - शेजाऱ्याच्या बायकोचे स्नानगृहातील चित्रीकरण केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी बुधवारी ३० वर्षीय टॅक्सी चालकाला जोगेश्वरीतून अटक केली. तक्रारदार महिला टॅक्सी चालकाच्या शेजारच्या घरात राहते. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी दिली. 

महिला स्नानगृहात (बाथरूम) असताना घराचं छप्पर आणि भिंतीच्या गॅपमध्ये लपवून ठेवलेला फोन महिलेच्या नजरेस पडला. तिने लगेच हा फोन ताब्यात घेतला आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. जोगेश्वरी बेहराम बागमध्ये आरोपी आणि तक्रारदार महिला एकाच चाळीत राहतात. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ३० वर्षीय टॅक्सी चालकाला अटक केली असून पुढील तांत्रिक तपासासाठी आरोपीचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. 

 


Web Title: The taxi driver arrested who was doing objectionable shooting of neighboring women
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.