हातावरील टॅटूमुळे चोर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 01:14 IST2020-06-08T01:13:54+5:302020-06-08T01:14:28+5:30

जुहू पोलिसांची कामगिरी : दिग्दर्शकाच्या घरात केली होती चोरी

Tattoos on the hands of thieves | हातावरील टॅटूमुळे चोर गजाआड

हातावरील टॅटूमुळे चोर गजाआड

मुंबई : केवळ हातावरील टॅटूमुळे दिग्दर्शकाच्या घरातूूून मोबाइल आणि रोकड चोरीची उकल करण्यास जुहू पोलिसांना यश आले आहे. मोठ्या शिताफिने पोलिसांनी या चोराचा शोध घेतला़ त्यासाठी पोलिसांनी खबरींचा आधार घेतला़ शहर पिंजून काढले़ त्यामुळे मुंबई पोलिसांनीही पथकाचा फोटो टिष्ट्वट करत कौतुक केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू परिसरात राहणारे तक्रारदार सोहम सहा यांच्या घरात ही चोरी झाली आहे. ते दिग्दर्शक असून त्यांनी काल, लकसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. २६ मे रोजी सहा हे घरात झोपले असताना, पहाटे पावणेचारच्या सुमारास अनोळखी लुटारूने खिडकीतून घरात प्रवेश केला आणि दोन मोबाइलसह ३ हजारांची रोकड चोरी करून पळ काढला. सहा यांच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.जूहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू केला.
यात, दोन तरुणांनी तोंडाला मास्क लावून घरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले़ याच आरोपींपैकी एकाच्या हातावर मलिका नावाचा टॅटू दिसून आला. पथकाने हाच धागा पकड़ून प्रेम एल. देवेद्र (२५) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चोरी गेलेल्या मोबाइलपैकी एक आयफोन जप्त केला आहे. त्याच्या चौकशीतून त्याचा सहकारी अर्जुन सुरेशबाबू देवेंद्र यालाही अटक केली.

Web Title: Tattoos on the hands of thieves