भयंकर! लॉ कॉलेजमध्ये क्लास सुरू होताच विद्यार्थिनीवर झाडल्या गोळ्या; तरुणाने स्वतःलाही संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:39 IST2026-02-09T13:37:50+5:302026-02-09T13:39:16+5:30

पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली.

tarntaran classmate shot his classmate in head and then shot himself | भयंकर! लॉ कॉलेजमध्ये क्लास सुरू होताच विद्यार्थिनीवर झाडल्या गोळ्या; तरुणाने स्वतःलाही संपवलं

फोटो - आजतक

पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. उसमा गावातील 'माई भागो लॉ कॉलेज'मध्ये क्लास सुरू होताच एका विद्यार्थ्याने आपल्याच क्लासमेटची गोळ्या झाडून हत्या केली आणि क्षणार्धात स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

संदीप कौर असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याची ओळख प्रिन्स राज अशी आहे. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याप्रमाणे प्रिन्स राज वर्गात प्रवेश करतो आणि तिथे बसलेल्या संदीप कौरच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडतो. त्यानंतर लगेच तो पुन्हा पिस्तूल लोड करतो आणि स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतो. या गोळीबारात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

डीएसपी (DSP) जगबीर सिंह यांनी सांगितलं की, जसा क्लास सुरू झाला, तशीच ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलं असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होत आहे की, एक विद्यार्थी कॉलेजच्या आत पिस्तूल घेऊन कसा काय शिरला? गेटवर त्याची कोणतीही तपासणी झाली नव्हती का?

प्रिन्स राजने कॉलेजमध्ये इतकं भयानक पाऊल का उचललं, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडलं की काही जुन्या वैमनस्यातून, यादृष्टीने पोलीस कुटुंबीय आणि इतर वर्गमित्रांची चौकशी करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

Web Title: tarntaran classmate shot his classmate in head and then shot himself