तरन तारन गोळीबार : आधी प्रेयसीवर झाडल्या गोळ्या, मग स्वतःवर; मृत्यूशी झुंज संपली, रक्ताळलेल्या प्रेमकांडाचा भीषण शेवट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:23 IST2026-02-12T14:19:14+5:302026-02-12T14:23:48+5:30

संदीप कौर या तरुणीची दिवसाढवळ्या वर्गात गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्या प्रिंस राज याचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Taran Taran shooting: First shots were fired at the lover, then at himself; the fight to the death ended, a bloody love affair came to a horrific end! | तरन तारन गोळीबार : आधी प्रेयसीवर झाडल्या गोळ्या, मग स्वतःवर; मृत्यूशी झुंज संपली, रक्ताळलेल्या प्रेमकांडाचा भीषण शेवट!

तरन तारन गोळीबार : आधी प्रेयसीवर झाडल्या गोळ्या, मग स्वतःवर; मृत्यूशी झुंज संपली, रक्ताळलेल्या प्रेमकांडाचा भीषण शेवट!

पंजाबच्या तरन तारन येथील 'माई भागो लॉ कॉलेज'मध्ये ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या थरारक गोळीबाराने संपूर्ण देश हादरला होता. संदीप कौर या तरुणीची दिवसाढवळ्या वर्गात गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्या प्रिंस राज याचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमृतसरच्या गुरु नानक रुग्णालयात त्याने शेवटचा श्वास घेतला. या मृत्यूसह तरन तारन प्रकरणातील दोन्ही प्रमुख पात्रांचा अंत झाला असून, या प्रेमकांडाची भीषण परिणती आता समोर आली आहे.

नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? 

९ फेब्रुवारीला सकाळी ९:१५ च्या सुमारास, जेव्हा कॉलेजमध्ये तास सुरू व्हायचे होते, तेव्हा प्रिंस राज हातात पिस्तूल घेऊन वर्गात घुसला. वर्गात विद्यार्थी आपसात गप्पा मारत असताना प्रिंस थेट शेवटच्या बाकड्यावर बसलेल्या २० वर्षीय संदीप कौरकडे गेला. दोघांमध्ये काही वेळ वाद झाला आणि रागाच्या भरात प्रिंसने संदीपच्या कपाळावर गोळी झाडली. संदीपचा जागीच मृत्यू झाला, त्यानंतर प्रिंसने त्याच रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली होती.

वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा वापर 

तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रिंसने या कृत्यासाठी त्याचे वडील, जे सीआरपीएफ जवान आहेत, त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा वापर केला. त्याचे वडील सुट्टीवर घरी आले होते आणि आपली पिस्तूल सोबत घेऊन आले होते. प्रिंसने संधी साधून ती पिस्तूल चोरली आणि थेट कॉलेज गाठले.

एकतर्फी प्रेम की खर्चाचा हिशोब? 

दोन दावे समोर या प्रकरणामागील कारणाबाबत आता दोन वेगवेगळे दावे समोर येत आहेत. संदीपच्या बहिणीने आणि आईने आरोप केला आहे की, प्रिंस हा संदीपवर एकतर्फी प्रेम करायचा आणि तिला सतत त्रास द्यायचा. संदीपने त्याला अनेकदा समजावले होते, पण तो ऐकत नव्हता. काही गोपनीय सूत्रांच्या मते, प्रिंस हा संदीपच्या शिक्षणाचा खर्च उचलत होता. मात्र, जेव्हा त्याला समजले की संदीपचा साखरपुडा दुसऱ्या मुलाशी झाला आहे, तेव्हा तो संतापला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

७ बहिणींचा आधार हिरावला! 

संदीप कौरच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांचे आधीच निधन झाले असून, घरात सात बहिणी आणि एक १२ वर्षांचा भाऊ आहे. या कुटुंबाची मोठी आशा असलेली संदीप आता या जगात नाही. दुसरीकडे, आज प्रिंसचाही मृत्यू झाल्याने या प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत वाढली आहे. सध्या संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण थरारक घटना कैद झाली असून, त्या आधारे पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Web Title : तरन तारन गोलीबारी: कॉलेज में प्यार, जुनून और मौत का खूनी खेल

Web Summary : पंजाब के कॉलेज में गोलीबारी: प्रिंस ने संदीप को मारकर खुद को गोली मार ली। उसने पिता की सर्विस रिवॉल्वर का इस्तेमाल किया। प्रेम त्रिकोण या वित्तीय विवाद ने इस दुखद घटना को जन्म दिया, जिससे शोकग्रस्त परिवार और भयभीत समुदाय रह गए। पुलिस सीसीटीवी फुटेज की जांच कर रही है।

Web Title : Tarn Taran Shooting: Love, Obsession, and Death in College Classroom

Web Summary : Punjab college shooting: Prince killed Sandeep, then himself. He used his father's service revolver. Love triangle or financial dispute fueled the tragic act, leaving behind grieving families and a fearful community. Police investigate the CCTV footage.