मित्रासोबत बोलतेस, पालकांनाच तक्रार करतो! धमकावत शेजाऱ्याने केले लैंगिक चाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 03:24 IST2021-03-30T03:23:38+5:302021-03-30T03:24:02+5:30
Crime News : मित्रांसोबत गप्पा मारतेस? तुझ्या घरच्यांना तक्रार करतो, अशी धमकी देऊन तेरा वर्षीय मुलीला स्वतःच्या घरी नेत तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या मोईनुद्दीन शेख या शेजाऱ्याला अटक करण्यात आली.

मित्रासोबत बोलतेस, पालकांनाच तक्रार करतो! धमकावत शेजाऱ्याने केले लैंगिक चाळे
मुंबई : मित्रांसोबत गप्पा मारतेस? तुझ्या घरच्यांना तक्रार करतो, अशी धमकी देऊन तेरा वर्षीय मुलीला स्वतःच्या घरी नेत तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या मोईनुद्दीन शेख या शेजाऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई डी.एन. नगर पोलिसांनी केली असून, याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
जुहू गल्लीच्या सलामीया हॉटेलमागे पीडित मुलगी तिच्या एका मित्रांसोबत गप्पा मारत उभी होती. तेव्हा त्याच परिसरात राहणारा शेख तेथे आला आणि मुलाशी बोलत असल्याची तक्रार घरच्यांना करण्याची धमकी देऊन तिच्या मित्राला हाकलून लावले. त्यानंतर तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि अश्लील चाळे करू लागला. पीडितेने त्याला विरोध केला, मात्र तरीही त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. रडतच घरी जाऊन तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पालकांनी थेट डी.एन. नगर पोलीस ठाणे गाठले. पाेलिसांनी शेखला अटक केली.