Taking her to the forest, her brother gang-raped her with a friend and killed her pda | जंगलात नेऊन भावाने मित्रासह बहिणीवर केला सामूहिक बलात्कार अन् केली हत्या

जंगलात नेऊन भावाने मित्रासह बहिणीवर केला सामूहिक बलात्कार अन् केली हत्या

ठळक मुद्देसामूहिक बलात्कारानंतर मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावास आणि त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.तिचा भाऊ आणि त्याचे तीन मित्र तिला १७ मे रोजी जवळच्या जंगलात घेऊन गेले. आरोपीने मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह जवळच्या नाल्यात टाकला.

जयपूरच्या मनोहरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कारानंतर मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावास आणि त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसिकदृष्ट्या दुर्बल झाल्यामुळे ही दहा वर्षांची मुलगी तिची दैनंदिन कामं देखील करू शकत नव्हती. पोलिसांनी सांगितले की, तिचा भाऊ आणि त्याचे तीन मित्र तिला १७ मे रोजी जवळच्या जंगलात घेऊन गेले. आरोपीने मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह जवळच्या नाल्यात टाकला.


याबाबत मुलीच्या वडिलांनी १८ मे रोजी मुलगी हरवल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तपासादरम्यान पोलिसांना या चौघांना संशय आला. मनोहरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस रामस्वरूप म्हणाले की, शनिवारी चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे वय 19 ते 21 वर्षांदरम्यान आहे आणि सर्व वीटभट्टीवर काम करतात.

जम्मू-काश्मीरमध्ये IBने ताब्यात घेतले पाकिस्तानी 'गुप्तहेर' कबुतर

 

पोटच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; नराधम पित्याला आईसह दोन मुलांनी मारले

 

पोलिसांनी कॉल डिटेल, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मृत मुलीच्या झोपडपट्टीच्या सभोवतालच्या शेजाऱ्यांनी अधिक चौकशी केली. संशयाच्या आधारे मृत युवतीचा भाऊ आणि त्याच्या तिन्ही मित्रांना बरेली येथील रहिवासी असलेल्या साजिद अली, अमजद अली आणि वाजिद अली या दोघांकडून अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

कोरोना इम्पॅक्ट; बलात्कारातील फरार आरोपी घरी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला!

 

आई आणि 'त्या'ने पप्पांचा गळा आवळला; चिमुरड्याने केली पोलखोल

 

Web Title: Taking her to the forest, her brother gang-raped her with a friend and killed her pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.