Take strong action against Payal Rohatgi | पायल रोहतगीच्या विरोधात कडक कारवाई करा 
पायल रोहतगीच्या विरोधात कडक कारवाई करा 

ठळक मुद्देआक्षेपार्ह मजकूर ट्विटर या सोशल मिडियावर टाकून छत्रपतींचा अवमान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई पोलीस परिमंडळ - १ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेऊन निवेदन सादर

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या पायल रोहतगी या अभिनेत्रीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पोलीस उपायुक्तांना देण्यात आले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर ट्विटर या सोशल मिडियावर टाकून छत्रपतींचा अवमान केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई पोलीस परिमंडळ - १ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी मुंबई सरचिटणीस उत्तमराव माने, युवकचे सचिन शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे कुलाबा तालुकाध्यक्ष जयेश धनी, प्रसना अचलकर,समीर बुधाते आदी उपस्थित होते.

Web Title: Take strong action against Payal Rohatgi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.