घरगुती वादातून पत्नीवर तलवारीने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 21:22 IST2019-09-13T21:21:55+5:302019-09-13T21:22:57+5:30

घरगुती कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीच्या हातावर तलवारीने वार केला.

Swords struck on the wife due to family dispute | घरगुती वादातून पत्नीवर तलवारीने केले वार

घरगुती वादातून पत्नीवर तलवारीने केले वार

पिंपरी : घरगुती कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीच्या हातावर तलवारीने वार केला. ओटास्किम निगडी येथे गुरुवारी (दि. १२) सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शायनाज आसिफ शेख (वय २०, रा. ओटास्किम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आसिफ जब्बार शेख (वय २३) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी शायनाज आणि आरोपी आसिफ पती-पत्नी आहेत. शायनाज गुरुवारी त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. माहेरी चहा पित असताना आरोपी त्यांच्याकडे आला. त्याने माझी मुलगी मला दे, मी तिला घरी घेऊन जाणार आहे,  असे म्हणत भांडण सुरू केले. त्यावर शायनाज यांनी मुलगी देण्यास नकार दिला. यावरून आसिफ याने शायनाज यांच्या तळहातावर लहान तलवारीने वार करून जखमी केले. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Swords struck on the wife due to family dispute