शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम; अद्याप दिलासा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 5:57 PM

जामीनावर शुक्रवारी सुनावणी

ठळक मुद्दे ईडीनेही चिदंबरम यांना नव्याने लुकआऊट नोटीस जारी करून त्यांना भारताबाहेर जाण्यास मनाई केली  आहे.या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनासर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडूनही दिलासा मिळालेला नाही. चिदंबरम यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई शुक्रवारी सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. काल आणि आज सकाळी सीबीआयचे पथक चेन्नई येथील चिदंबरम यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र, चिदंबरम नसल्याने रिकाम्या हाती पथकास परतावे लागले होते. तसेच ईडीनेही चिदंबरम यांना नव्याने लुकआऊट नोटीस जारी करून त्यांना भारताबाहेर जाण्यास मनाई केली  आहे. त्यामुळे देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना ईडीची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. 

दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडूनही तूर्तास दिलासा मिळू शकला नाही. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवले होते असून गोगोई यांनी या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात काढलेली लुकआऊट नोटीस रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदलाला पाठवली आहे. त्यात चिदंबरम यांना ईडीच्या परवानगी शिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल सायंकाळपासून चिदंबरम यांचा कुठेच पत्ता लागत नाही. त्यामुळे ईडीने चिदंबरम यांचा शोध सुरू ठेवला आहे. धक्कादायक म्हणजे चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी आयएनएक्स घोटाळ्यात मिळालेल्या लाचेच्या रकमेतून स्पेनमध्ये एक टेनिस क्लब आणि अमेरिकेत बंगला खरेदी केला आहे. त्याशिवाय कार्तीने देश-विदेशात अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केली. याप्रकरणी चिदंबरम यांना ताब्यात घेऊन ईडीला त्यांची चौकशी करायची आहे. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयArrestअटक