Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:34 IST2025-09-24T16:32:20+5:302025-09-24T16:34:11+5:30
swami satchidananda saraswati news: एका कथित बाबाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर दिल्लीत खळबळ उडाली आहे. हा बाबा मुलींनी नापास करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता, अशीही माहिती समोर आली आहे.

Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
Swami Chaitanyananda saraswati: स्वयंघोषित स्वामी चैतन्यानंद सरस्वती याने शिकणासाठी आश्रमात राहणाऱ्या १७ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. १७ मुलींनी स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर आरोप केले आहेत. यात वसतिगृहातील वॉर्डनही त्याला मदत करत असल्याचे समोर आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण दिल्लीच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त ऐश्वर्या सिंह यांनी सांगितले की आरोपी चैतन्यानंद यूएन डिप्लोमॅटिक नंबर प्लेटचाही वापर करत होता.
मुलींना धमकी देऊन बोलवायचा
स्वामी चैतन्यानंद सरस्वती मुलींना व्हॉट्सअपवरून मेसेज करून बोलवायचा. मुलीने नकार दिला तर तिला परीक्षेत कमी गुण द्यायला लावणार अशी धमकी द्यायचा. इतकंच नाही तर मुलीचा नकार कायम राहिला, तर परीक्षेत नापास करण्याचीही धमकी द्यायचा.
पोलिसांनी सांगितले अनेक मुलींनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती विरोधात तक्रार दिली आहे. चैतन्यानंद हा इन्स्टिट्यूटमध्ये मॅनेजमेंटचे काम पाहत होता. पोलीस अधिकारी ऐश्वर्या सिंह यांनी सांगितले की, सर्व पीडित मुलींचे आणि इतर संबंधितांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल. चैतन्यानंदविरोधात सर्व मुलींनी वेगवेगळ्या तक्रारी दिल्या आहेत. पहिली तक्रार ऑगस्टमध्ये करण्यात आली होती.
व्हाट्सअपवरून काय पाठवायचा मेसेज
चैतन्यानंद व्हॉट्सअपवरून मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा. तो मुलींना सोबत राहिल्यास तुला परदेशात घेऊन जातो, असे आमिषही दाखवायचा. या प्रकरणात वसतिगृहाच्या तीन अधीक्षकांनाही आरोपी करण्यात आले आहे. या महिला अधीक्षक मुलींना धमक्या द्यायच्या आणि चैतन्यानंदसोबतचे व्हॉट्सअप चॅट डिलिट करायला लावायच्या, असे पोलिसांनी सांगितले.