स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 11:52 IST2025-10-05T11:51:13+5:302025-10-05T11:52:38+5:30
Swami Chaitanyananda : दिल्लीतील स्वामी चैतन्यानंदचे नवंनवे कारनामे समोर येत आहेत. चैतन्यानंद सोशल मीडियावरही तरुणींशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. त्याचे काही स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत.

स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
Swami Chaitanyananda News: मुलींना आमिषे देऊन, धमक्या देऊन, प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना शय्यासोबत करायला लावणाऱ्या स्वामी चैतन्यानंदचे कारनामे हळूहळू उजेडात येऊ लागले आहेत. स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही असेच चाळे सुरू होते. मुलींच्या फोटोंवर चैतन्यानंद कमेंट्स करायचा. तरुणींचे प्रोफाईल बघायचा.
स्वतःला बाबा म्हणून दाखवणाऱ्या स्वामी चैतन्यानंदचे काळे कारनामे उघड झाले. मुलींनी पोलिसांत तक्रारी दिल्यानंतर स्वामी चैतन्यानंद वासनेचा पुजारी असल्याचे बिंग फुटले. मुलींचे लैंगिक शोषण करणे, त्याचे व्हिडीओ, फोटो काढणे यात तो सहभागी असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावर कमेंट्स
पोलीस स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडिया अकाऊंटही बघत आहेत. स्वामी चैतन्यानंद व्हॉट्सअपवरूनच नव्हे तर इतर सोशल मीडियावरूनही तरुणींशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तो तरुणींच्या पोस्टखाली कमेंट्स करायचा. पोलिसांनीही त्याच्या या कमेंट्सही पुरावे जमा केल्या आहेत.
चैतन्यानंदच्या सोशल मीडियावरील कमेंट्स
चैतन्यानंदचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत
पोलिसांनी अटक केलेल्या स्वामी चैतन्यानंदची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत त्याला कोठडी सुनावली आहे.
सुनावणी वेळी स्वामी चैतन्यानंदच्या वकिलांनी न्यायालयात काही मागण्या केल्या. नियमितपणे औषधी, त्याचबरोबर ते संन्यासी असल्याने त्यांना कांदा, लसुन नसलेले जेवण देण्यात यावे. त्याचबरोबर धार्मिक वस्त्र वापरण्याची आणि आध्यात्मिक साहित्य ठेवण्याची परवानगी दिली जावी.