बोदवड येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 18:51 IST2018-11-30T18:49:17+5:302018-11-30T18:51:55+5:30

पाच ते सहा महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते.प्रियंका गोपाळ पाटील (वय २०) असं या मृत महिलेचं नाव आहे.

Suspicious death of a married couple in Bodwad | बोदवड येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू 

बोदवड येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू 

ठळक मुद्देघटना करंजी- पाचदेवळी तालुका बोदवड येथे काल रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली पाच ते सहा महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होतेमुलीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप प्रियंकाच्या आईने केला आहे

जळगाव - एका २० वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना करंजी- पाचदेवळी तालुका बोदवड येथे काल रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. पाच ते सहा महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते.प्रियंका गोपाळ पाटील (वय २०) असं या मृत महिलेचं नाव आहे. गोपाळ शालीग्राम पाटील (वय २४) यांच्याशी तिचे लग्न झाले होते. कॅमेरा घेण्यासाठी माहेरहून १० हजार रुपये आणावेत, यावरुन दोघा पती - पत्नीत वाद झाला होता. यातून तिने रात्री गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याचप्रमाणे गोपाळ यानेच मुलीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप प्रियंकाच्या आईने केला आहे.

Web Title: Suspicious death of a married couple in Bodwad