50 हून अधिक टेम्पो चालकांच्या चौकशीनंतर लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 23:52 IST2018-10-18T22:43:15+5:302018-10-18T23:52:30+5:30

तब्बल 50 हून अधिक टेम्पो चालकांची चौकशी केली. त्यानंतर आरोपी सिराजचा पोलिसांना शोध घेता आला.

Suspected sexual harassment arrest on minor girls after 50 more Tempo drivers inquiry | 50 हून अधिक टेम्पो चालकांच्या चौकशीनंतर लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमास अटक

50 हून अधिक टेम्पो चालकांच्या चौकशीनंतर लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमास अटक

मुंबई - साकी नाका पोलिसांनी 11 वर्षीय मुलीचे अनैसर्गिक लैंगिक शोषण करणाऱ्या सिराज खान मेहंदी हसन (वय 30) या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 50 पेक्षा अधिक टेम्पो चालकांची चौकशी केल्यानंतर या नराधामस अटक करण्यात आली आहे.

साकी नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय धक्कादायक घटना घडली. सिराज या टेम्पो चालकाने मैत्रिणीकडून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस रस्त्यात अडवून आपल्या टेम्पोत खेचून तिच्यावर बळजबरीने लैंगिक शोषण केले. तसेच या नराधमाने तिच्यावर बलात्कार करून अनैसर्गिक लैंगिक शोषण केले असल्याची माहिती साकी नाका पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे पोलिसांकडे कोणताही या गुन्ह्याचा धागादोरा नसूनही आरोपीच्या 22 तासात मुसक्या आवळल्या. तपासासाठी प्रामुख्याने वापरले जाणारे सीसीटीव्ही फुटेजही नसल्याने पोलिसांनी तब्बल 50 हून अधिक टेम्पो चालकांची चौकशी केली. त्यानंतर आरोपी सिराजचा पोलिसांना शोध घेता आला.

Web Title: Suspected sexual harassment arrest on minor girls after 50 more Tempo drivers inquiry