Sushant Singh Rajput Suicide: ‘ती’ बंगाली मुलगी कोण? सुशांत राजपूतच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा, कुटुंबाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 17:01 IST2020-06-14T16:59:05+5:302020-06-14T17:01:04+5:30

अभिनेत्याच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Sushant Singh Rajput Suicide: Actor Sushant Singh Rajput, Family Demands Judicial Enquiry | Sushant Singh Rajput Suicide: ‘ती’ बंगाली मुलगी कोण? सुशांत राजपूतच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा, कुटुंबाची मागणी

Sushant Singh Rajput Suicide: ‘ती’ बंगाली मुलगी कोण? सुशांत राजपूतच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा, कुटुंबाची मागणी

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्या का केली? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. याच दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सुशांतच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसल्याचं सांगत चौकशी अद्याप सुरु आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांनी सुशांतच्या आत्महत्येची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, अभिनेत्याच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात होता. सुशांत सिंग राजपूत यांच्या नोकराने पोलिसांना बोलावून त्यांच्या आत्महत्येची माहिती दिली.

मित्रांनी खोलीचा दरवाजा तोडला, सुशांत पंख्याला लटकला होता

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी सुशांत सिंग राजपूत याचे काही मित्रही त्याच्या घरी होते. सुशांत काही काळ त्याच्या खोलीत गेला होता. जेव्हा तो जास्त वेळ बाहेर आला नाही नाही, तेव्हा त्याच्या मित्रांनी कॉल करण्यास सुरुवात केली. कॉलला प्रतिसाद न मिळाल्याने मित्रांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना समोर सुशांतचा मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. या घटनेनंतर त्याच्या नोकराने पोलिसांना माहिती दिली.

सुशांत सिंह राजपूत याचे मित्र म्हणतात की, तो बर्‍याच दिवसांपासून नैराश्येत होता. सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने काही आठवड्यापूर्वी एका व्यावसायिकाबरोबर लग्न केले. सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियन हिनेही पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे.  या प्रकरणात सुशांतचीही चौकशी करण्यात आली होती, असं सूत्रांचे म्हणणं आहे.


दरम्यान, सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच वडिलांचीही तब्येत खालावली आहे. सुशांतच्या मामांनी या मृत्यूची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सुशांत एका बंगाली मुलीमुळे त्रस्त होता. काही दिवसांनी वडिलांची भेट होणार होती पण दुर्दैवाने ही बातमी समोर आली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सुशांतने ‘छिछोरे’मध्ये आत्महत्या न करण्याचा संदेश दिला अन् स्वत:च आत्महत्या केली...!!

अभिनेता नाही तर इंजिनिअर व्हायचे होते सुशांत सिंग राजपूतला, इंजिनिअरिंगच्या परीक्षेत देशात आला होता 7

 

एक्स मॅनेजर दिशाच्या सुसाइडच्या वृत्ताने हादरला होता सुशांत आणि नंतर स्वतःच उचलले हे पाऊल

Web Title: Sushant Singh Rajput Suicide: Actor Sushant Singh Rajput, Family Demands Judicial Enquiry