मारेकरी कोण? याची माहिती, मलाही जीवे मारण्याची धमकी; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 08:17 PM2020-08-17T20:17:34+5:302020-08-17T20:18:16+5:30

Sushant Singh Rajput Deathगणेश हिवरकर याची सुशांतसोबत १२ वर्षापासून मैत्री होती. २००७ पासून बॉलिवूडमध्ये डान्स शिकवण्यामध्ये गणेशने मदत केली होती.

Sushant Singh Rajput Death I Know Who is the killer? claim of Sushant friend Ganesh Hivarkar | मारेकरी कोण? याची माहिती, मलाही जीवे मारण्याची धमकी; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक दावा

मारेकरी कोण? याची माहिती, मलाही जीवे मारण्याची धमकी; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक दावा

googlenewsNext

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुशांतचा मित्र गणेश हिवरकर यांनी काही दिवसांपूर्वी सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे, यात कोण सहभागी आहे हे माहिती आहे असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर गणेशला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं त्याने दावा केला आहे.

गणेश हिवरकर याची सुशांतसोबत १२ वर्षापासून मैत्री होती. २००७ पासून बॉलिवूडमध्ये डान्स शिकवण्यामध्ये गणेशने मदत केली होती. ते दोघंही चांगले मित्र होते. २०१९ पर्यंत गणेश सुशांतच्या संपर्कात होता. सुशांतच्या हत्येच्या कटात सुशांतचा जवळचा मित्र निर्माता संदीप सिंह हादेखील सहभागी आहे असा दावा त्याने केला आहे. संदीपच्या एका सहकाऱ्याने सांगितले की, दिशा सालियानसोबत जे काही वाईट घडलं त्याबद्दल सुशांत सिंग राजपूतला सांगण्यात आलं होतं. ज्यामुळे सुशांत याची माहिती माध्यमासमोर आणणार होता असा दावा त्याने केला.(Sushant Singh Rajput Death)

तसेच सुशांत पत्रकार परिषद घेणार ही माहिती संदीप सिंहने लीक केल्याने सुशांतची हत्या करण्यात आली. हत्येच्या एक दिवस अगोदर सुशांतच्या घरी पार्टी झाली होती. त्यात ५-६ लोक सहभागी होते. त्यांच्या उपस्थितीत हत्या झाली आहे. हत्या रात्री झाली की सकाळी हे माहिती नाही. पण पार्टीत सहभागी लोकांची नावे मला माहिती आहेत. या सर्व नावांचा खुलासा सीबीआयसमोर करणार असल्याचं गणेश हिवरकरने सांगितले. एबीपी न्यूजच्या मुलाखतीत त्याने हे मांडले आहे.(CBI)

दरम्यान, 5-6 ऑगस्टच्या रात्री माझ्या घराबाहेर ६ ते ७ लोक येऊन जोरजोरात दार आपटत होते. तुला टीव्ही येण्याची मोठी हौस आहे ना असं ते ओरडत होते. जवळपास अर्धा तास त्यांनी मला धमकावलं, मी ओशिवरा पोलीस स्टेशनला फोन लावून सांगितले तर मला एफआयआर नोंदवा असं सांगण्यात आलं. त्यानंतर ३ वेळा फोन करुनही पोलीस माझ्या घरी आली नाही. मुंबई पोलिसांवर(Mumbai Police) विश्वास नाही. सीबीआयनेच सुशांतच्या हत्येची चौकशी करावी अशी मागणी गणेशने केली. त्याचसोबत सुशांत तणावाखाली आत्महत्या करेल असा माणूस नव्हता. एका मुलीमुळे मी जेव्हा तणावाखाली आलो होतो, आत्महत्या करण्याचा विचार करत होतो, तेव्हा मला तणावातून बाहेर काढण्यासाठी सुशांतने मदत केली. ६ महिने त्याने मला साथ दिली. असा व्यक्ती आत्महत्या करु शकत नाही असंही गणेश हिवरकरने म्हटलं आहे.  

Web Title: Sushant Singh Rajput Death I Know Who is the killer? claim of Sushant friend Ganesh Hivarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.