सीबीआय आज घेणार रियाची झाडाझडती; शोविक, नीरजसह पाच जणांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:58 AM2020-08-28T02:58:18+5:302020-08-28T02:58:33+5:30

शोविक सकाळी दहाच्या सुमारास कागदपत्रे घेऊन सांताक्रुझमधील डीआरडीओ गेस्ट हाऊसला पोहचला. त्याच सुमारास अन्य चौघेही आले.

Sushant Singh Rajput Death: CBI to take action against Riya today | सीबीआय आज घेणार रियाची झाडाझडती; शोविक, नीरजसह पाच जणांची चौकशी

सीबीआय आज घेणार रियाची झाडाझडती; शोविक, नीरजसह पाच जणांची चौकशी

Next

मुंबई : सीबीआयने गुरुवारी या प्रकरणातील मुख्य संशयित, सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीसह पाच जणांची कसून चौकशी केली. शुक्रवारीदेखील रियाला चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुशांतचे बहिणीशी असलेले संबंध, ब्रेकअपपासून व्यवसायिक भागीदारी आणि आत्महत्येच्या घटनेपर्यंत शोविकडे माहिती विचारण्यात आली. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती याच्याशिवाय सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी, त्याचा माजी मॅनेजर रजत मेवानी आणि घरातील नोकर नीरज सिंह यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली.

शोविक सकाळी दहाच्या सुमारास कागदपत्रे घेऊन सांताक्रुझमधील डीआरडीओ गेस्ट हाऊसला पोहचला. त्याच सुमारास अन्य चौघेही आले. त्यांना स्वतंत्रपणे बसवून अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरू केली. सुशांत आणि त्याच्यासंबंधी प्रत्येक गोष्टीची सविस्तर विचारणा करण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे चौकशी सुरू होती.
 

Web Title: Sushant Singh Rajput Death: CBI to take action against Riya today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.