चार भामट्यांनी घेरले अन् तिच्यावर केला सामूहिक बलात्कार; बँकेतून घरी जाताना विद्यार्थिनीशी दुष्कर्म 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 20:50 IST2021-09-19T20:46:22+5:302021-09-19T20:50:22+5:30

Gangrape Case : मिळालेल्या माहितीनुसार, घरातील लोकांना बँकेत जाते सांगून विद्यार्थिनी घरातून निघून गेली होती.

Surrounded by four vagrants, gang-raped; Misconduct with a student on her way home from the bank | चार भामट्यांनी घेरले अन् तिच्यावर केला सामूहिक बलात्कार; बँकेतून घरी जाताना विद्यार्थिनीशी दुष्कर्म 

चार भामट्यांनी घेरले अन् तिच्यावर केला सामूहिक बलात्कार; बँकेतून घरी जाताना विद्यार्थिनीशी दुष्कर्म 

ठळक मुद्देमुलीसोबत आलेला तिचा मित्र कसा तरी मुलीला सायकलवरून विभूतीपूर पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि या प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर विभूतीपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

समस्तीपूर - बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण विभूतीपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. घटनेच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी संध्याकाळी उशिरा तिच्या मित्राच्या सायकलवरून घरी परतत होती, त्या दरम्यान चार तरुणांनी त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील लोकांना बँकेत जाते सांगून विद्यार्थिनी घरातून निघून गेली होती.


बँकेतून परतत असताना संध्याकाळ झाली होती. या दरम्यान, ती त्याच सायकलवर मित्रासह घरी परतत होती. दरम्यान, सिंघिया घाट पूल ओलांडल्यानंतर चार तरुणांनी त्यांना घेरले. पीडित मुलीसोबत तिचा मित्र असलेल्या त्या तरुणाला ओलिस ठेवून सामूहिक बलात्काराची घटना घडली. मुलीसोबत आलेला तिचा मित्र कसा तरी मुलीला सायकलवरून विभूतीपूर पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि या प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर विभूतीपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.


पीडित तरुणीला समस्तीपूर महिला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह रुग्णालयात पाठवण्यात आले. जेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी विभूतीपूर पोलिसांनी कारवाई करत चार तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींकडून पीडित विद्यार्थिनीला आणि तिच्या मैत्रिणींना बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पीडितेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया महिला पोलीस ठाण्यात सुरू आहे.

Web Title: Surrounded by four vagrants, gang-raped; Misconduct with a student on her way home from the bank