झाकणातून ॲसिड उडून काही नागरिक किरकोळ जखमी, सल्फीयुरिक ऍसिडचा टँकर जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 19:48 IST2022-01-18T19:47:24+5:302022-01-18T19:48:02+5:30
Sulfuric acid tanker seized : उल्हासनगर कॅम्प नं-४ श्रीराम चौकातून मंगळवारी सायंकाळी एक ऍसिड टँकर जात होता.

झाकणातून ॲसिड उडून काही नागरिक किरकोळ जखमी, सल्फीयुरिक ऍसिडचा टँकर जप्त
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील श्रीराम चौकातून जाणाऱ्या एका सल्फीयुरिक ऍसिड टँकरच्या झाकणातून ऍसिड उडून काही नागरिक किरकोळ जखमी झाले. चौकातील पोलिसांनी टँकर ताब्यात घेतला असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे संकेत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिले.
उल्हासनगर कॅम्प नं-४ श्रीराम चौकातून मंगळवारी सायंकाळी एक ऍसिड टँकर जात होता. यावेळी टँकरचे झाकण बरोबर न लागल्याने, ऍसिडचे थेंब बाहेर पडून ३ ते ४ नागरिक किरकोळ जखमी झाले. याप्रकारने एकच गोंधळ उडून नागरिकांनी ट्रक थांबून ठेवला. चौकातील पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात घेऊन आले.
ट्रक चालकांची चौकशी विठ्ठलवाडी पोलीस करीत असून ट्रक चालक व संबंधीतवार गुन्हा दाखल करण्याचे संकेत यावेळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिले. तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडून देण्यात आले. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत असून मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.