राहत्या घरामध्ये कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 17:10 IST2021-06-03T16:14:00+5:302021-06-03T17:10:09+5:30

Suicide Case : नाचनभट्टी येथील भुमेश्वर उत्तम हनुवते याला एक भाऊ असून लहान भाऊ कामानिमित्त बाहेरगावाला असतो.

Suicide of a youth by hanging himself with a rope in the room | राहत्या घरामध्ये कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

राहत्या घरामध्ये कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

ठळक मुद्देभुमेश्वर उत्तम हनुवते (२३) या युवकाने राहत्या घरामध्ये कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नवरगाव(चंद्रपूर) : सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी येथील भुमेश्वर उत्तम हनुवते (२३) या युवकाने राहत्या घरामध्ये कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नाचनभट्टी येथील भुमेश्वर उत्तम हनुवते याला एक भाऊ असून लहान भाऊ कामानिमित्त बाहेरगावाला असतो. तर घरी आई, वडील आणि भुमेश्वर असे तिघे घरी राहात होते. भुमेश्वर हा सकाळी दुसऱ्याच्या कामालासुद्धा गेला होता. आई-वडील शेतावर गेल्याची संधी साधून आतून दार लावले आणि धाब्याच्या कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पंचनामा करून नोंद दाखल केली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
 

Web Title: Suicide of a youth by hanging himself with a rope in the room