माझे हिच्यावर प्रेम आहे, मी हिला घेऊन जाईन; घरात घुसून तरुणाचा धुडगूस, तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 11:37 IST2021-09-19T11:36:24+5:302021-09-19T11:37:14+5:30

लोणखेडी येथील नितीन वसंत पाटील हा तरुण बुधवारी बेडसे यांच्या घरात घुसला. त्यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी झटापट केली. माझे हिच्यावर प्रेम आहे. मी हिला घेऊन जाईन, असे सांगत त्याने भटू बेडसे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली.

Suicide of a young Girl after the rowdyism of a young man | माझे हिच्यावर प्रेम आहे, मी हिला घेऊन जाईन; घरात घुसून तरुणाचा धुडगूस, तरुणीची आत्महत्या

माझे हिच्यावर प्रेम आहे, मी हिला घेऊन जाईन; घरात घुसून तरुणाचा धुडगूस, तरुणीची आत्महत्या

धुळे :  एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्याशी झटापट केली, शिवाय शिवीगाळ करत मारहाण केल्याने तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तरुणीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी लोणखेडी येथील नितीन वसंत पाटील या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोणखेडी येथील नितीन वसंत पाटील हा तरुण बुधवारी बेडसे यांच्या घरात घुसला. त्यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी झटापट केली. माझे हिच्यावर प्रेम आहे. मी हिला घेऊन जाईन, असे सांगत त्याने भटू बेडसे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर भाग्यश्री ही घरातून बेपत्ता झाली. शुक्रवारी विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला.

Web Title: Suicide of a young Girl after the rowdyism of a young man