Suicide : गळफास घेऊन एका युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:27 IST2021-05-18T16:27:09+5:302021-05-18T16:27:24+5:30
चंद्रपूर : मूल पोलीस ठाण्याच्या बेंबाळ पोलीस चौकी हद्दीतील नांदगाव येथील एका युवकाने घराच्या फाट्याला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या ...

Suicide : गळफास घेऊन एका युवकाची आत्महत्या
चंद्रपूर : मूल पोलीस ठाण्याच्या बेंबाळ पोलीस चौकी हद्दीतील नांदगाव येथील एका युवकाने घराच्या फाट्याला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल विजय चलाख (२५) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. बेंबाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. विशालच्या पश्चात पश्चात पत्नी, आई-वडील, एक मूलगी आहे.
घरातील कमावत्या व्यक्तीने जगाचा निरोप घेतल्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई आनंदराव तितिरमारे, पुंडलिक परचाके गायकवाड, जुमनाके करीत आहेत.
बल्लारपुरात दुचाकीचोरांना ठोकल्या बेड्या, चार वाहने जप्तhttps://t.co/WypSvNiPP1
— Lokmat (@MiLOKMAT) May 18, 2021
अश्लील व्हिडिओ करून मागितली 3 कोटीची खंडणी, हनीट्रॅपमध्ये अडकला क्लासवन अधिकारीhttps://t.co/CImIQNnvtv
— Lokmat (@MiLOKMAT) May 18, 2021