शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात लाइव्ह व्हिडीओ करत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 03:58 IST

धनश्री जाधव या माझा भविष्यकाळ वाईट आहे, असे वारंवार मित्रांना सांगत होत्या. स्वभावाने हट्टी होती, असे तिच्या आई-वडिलांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोल्हापूर : मोबाइलवर लाइव्ह व्हिडीओ करत विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आर. के. नगरातील हरी पार्क, पोस्टल कॉलनीत बुधवारी मध्यरात्री घडली. धनश्री जाधव (२५, सध्या रा. आर. के. नगर, कोल्हापूर. मूळ गाव एरंडोळ, ता. आजरा) असे मृत महिलेचे नाव आहे. उदय पालकर या घरमालकांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

धनश्री जाधव यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. तो आई-वडिलांकडे असतो. त्या पतीपासून विभक्त राहत होत्या. पुण्यात दोन वर्षे खासगी नोकरी करून त्या गेली वर्षभर कोल्हापुरात आर. के. नगरातील पालकर यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होत्या. एका बँकेच्या क्रेडिट कार्ड मार्केटिंगचे काम त्या करत होत्या. त्यांची कोल्हापुरात एकासोबत मैत्री जमली होती. बुधवारी रात्री त्यांनी मित्राशी संवाद साधला. त्यानंतर विवाहितेने गळफास लावून आत्महत्या करत असल्याचे मोबाईलवरून व्हिडिओ मित्राला पाठविला. त्यावेळी मित्राने धनश्री जाधव राहत असलेले घर गाठले. मित्राने घरमालक पालकर यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी दार ठोठावून धनश्रीला दार उघडण्याबाबत विनंती केली, पण प्रतिसाद न आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांनी छताच्या पंख्याला वायरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

खोलीमध्ये मिळालेल्या सुसाईड नोटवर आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर आहे. त्यामुळे त्यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. आत्महत्या करत असल्याचा मोबाइलवरील व्हिडिओ विवाहितेने तिच्या मित्राला पाठविला होता. तो व्हिडीओ करवीर पोलिसांनी जप्त केला.

टॅग्स :Suicideआत्महत्या