नौदलाच्या गार्डने गोळी झाडून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 16:58 IST2019-01-10T16:54:44+5:302019-01-10T16:58:00+5:30
घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

नौदलाच्या गार्डने गोळी झाडून केली आत्महत्या
मुंबई - नौदलातील एका गार्डने स्वतःजवळील 'एसएलआर'मधून गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना ट्रॉम्बे येथे घडली आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. केशर सिंग (५६) असे या नौदलाच्या गार्डचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
मूळचा पंजाब राज्यातील केशर सिंग हे मुंबईतील ट्रॉम्बे येथील नौदल या ठिकाणी वॉच टॉवरवर तैनात होते. गार्डची ड्युटी करणारे सिंग हे १५ दिवसांची सुट्टी काढून शुक्रवारी पंजाब येथे घरी जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी गुरुवारी ऑनड्युटी असताना स्वतःच्या एसएलआर या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केसर सिंग ऑक्टोबरपासून कार्यरत होते. येथील वॉच टावरवर एकटे तैनात असताना स्वतःवर गोली झाड़ून आत्महत्या केली आहे. घटनास्थळाहून कुठल्य सुसाइड नोट सापडलेली नसून पोलिसांनी अधिक तपास सुरु आहे.