मोबाईलच्या वेडापायी हुशार विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 19:11 IST2019-01-07T19:06:52+5:302019-01-07T19:11:45+5:30

संबंधित मुलगी अभ्यासात अतिशय हुशार होती. काही महिन्यांपूर्वी तिला आई-वडिलांनी मोबाईल घेऊन दिला होता. नाताळच्या सुट्ट्या संपल्यानंतर तिने अभ्यासाकडे लक्ष द्यावे म्हणून आईने तिच्याकडून मोबाईल काढून घेतला होता.

suicide by scholar student due to madness of mobile | मोबाईलच्या वेडापायी हुशार विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

मोबाईलच्या वेडापायी हुशार विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

ठळक मुद्दे१४ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.अभ्यासाकडे लक्ष द्यावा म्हणून आईने तिच्याकडून मोबाईल काढून घेतला होता.रागाच्या भरात तिने आईच्या ओढणीने घरातील पंख्याला गळफास घेतला

नवी मुंबई - आईने मोबाईल दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कोपरखैरणे परिसरात घडली आहे. 

संबंधित मुलगी अभ्यासात अतिशय हुशार होती. काही महिन्यांपूर्वी तिला आई-वडिलांनी मोबाईल घेऊन दिला होता. नाताळच्या सुट्ट्या संपल्यानंतर तिने अभ्यासाकडे लक्ष द्यावा म्हणून आईने तिच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. त्यामुळे ती नाराज होती. गुरुवारी दुपारी ती शाळेतून घरी आल्यानंतर तिने आईकडे मोबाईल मागितला. मात्र, आईने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तिने आईच्या ओढणीने घरातील पंख्याला गळफास घेतला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. 

Web Title: suicide by scholar student due to madness of mobile