सासूच्या छळास कंटाळून २ वर्षांच्या मुलाचा खून करत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने केली आत्महत्त्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 13:22 IST2018-12-22T13:18:04+5:302018-12-22T13:22:52+5:30
तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, मात्र वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्दैव.. माझी सासू सुजाता ही माझा वारंवार छळ करत आहे.

सासूच्या छळास कंटाळून २ वर्षांच्या मुलाचा खून करत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने केली आत्महत्त्या
हड़पसर : सासूच्या छळास कंटाळून एका पोलिस पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या कोवळ्या मुलाचा खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना हडपसर येथील मगरपट्टा परिसरात शनिवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकात काम करणारा पोलीस कर्मचारी अमित दत्तात्रय कांबळे यांची पत्नी जान्हवी अमित कांबळे (वय २२) हिने आपल्या अवघ्या दोन वर्षांच्या कोवळ्या शिवांश या मुलाचा खून करून,ओढणीच्या साह्याने स्वत: फॅनला गळफा्रस घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी(दि. २२) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली .
आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अमित (पती) तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, मात्र वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्दैव.. माझी सासू सुजाता ही माझा वारंवार छळ करत आहे. असे नमूद केल्याचे दिसते.अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत,