नोकरीच्या शोधासाठी कोल्हापूरात आलेल्या पंढरपूरच्या तरुणाची आत्महत्या
By तानाजी पोवार | Updated: August 7, 2022 20:04 IST2022-08-07T20:02:58+5:302022-08-07T20:04:03+5:30
Suicide Case :भाड्याच्या घरात गळफास घेतला लावून

नोकरीच्या शोधासाठी कोल्हापूरात आलेल्या पंढरपूरच्या तरुणाची आत्महत्या
कोल्हापूर : नोकरी अगर व्यवसायाच्या शोधासाठी महिन्यापूर्वी पंढरपूरहूनकोल्हापूरात आलेल्या तरुणाने रायगड कॉलनी येथे राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. राज सुनिल मुळे (वय २६ रा. रायगड कॉलनी, पाचगाव. मुळ गाव- पंढरपूर) असे त्याचे नाव आहे. रविवारी दुपारी घटना घडली.
राज मुळे यांचा पंढरपूर येथे वडीलोपार्जीत कुंकु विक्रीचा व्यवसाय आहे. महिन्यापूर्वी तो पत्नी व पाच वर्षाच्या मुलासह नोकरी अगर व्यवसायाच्या शोधासाठी कोल्हापूरात आला. रायगड कॉलनी येथे भाड्याने घर घेतले. पत्नीकडील नातेवाईकही कोल्हापूरात स्थायीक असल्याने त्यांच्या मदतीने येथे नोकरी अगर व्यवसाय सुरु करण्याचे त्याचा निश्चय होता.
शनिवारी पत्नी मुलासह पंढरपूरला गेल्या. रविवारी सकाळी त्याने जेवण केले. पत्नीने दुपारी त्यांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही. पत्नीने कोल्हापूरातील भावाला फोनवरुन कल्पना दिली. त्यांनी घरी जाऊन पाहिले असता दरवाजाला आतून बंद होता. कडी-कोयंडा मोडून आत प्रवेश केला असता राज मुळे याने छताच्या हुकाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळले. त्यांना उतरुन सीपीआरमध्ये आणले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.