लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या; पुण्याच्या तरुणावर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: December 1, 2022 16:00 IST2022-12-01T16:00:00+5:302022-12-01T16:00:06+5:30

मयत आरती ही तरुणी काही दिवसापूर्वी पुणे येथे राहण्यासाठी गेली होती.

Suicide of a young woman due to refusal of marriage; A crime against the youth of Pune | लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या; पुण्याच्या तरुणावर गुन्हा

लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या; पुण्याच्या तरुणावर गुन्हा

सोलापूर : प्रेमसंबंधातून गर्भवती राहिल्यानंतर लग्नाला नकार दिल्याने तरुणीने कंबर तलावात उडी घेऊन २९ ऑक्टोंबर रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी पीडितेची आई वनिता ( रा. जुना विडी घरकूल) यांच्या फिर्यादीवरून पुण्याच्या स्वप्नील बंडे ( रा. पुणे ) याच्यावर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मयत आरती ही तरुणी काही दिवसापूर्वी पुणे येथे राहण्यासाठी गेली होती. तेथे तिचे आरोपी स्वप्नील बंडे याच्या सोबत प्रेमसंबंध जुळले. यातून शारीरिक संबंध आल्याने आरती ही ५ महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर स्वप्निल याने तिला लग्नास नकार दिल्याने आरती हिने २९ ऑक्टोंबर रोजी सोलापुरातील कंबर तलावात उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येला आरोपी स्वप्नील बंडे हाच जबाबदार असल्याची तक्रार पीडितेच्या आईने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी बंडेवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई माळी करत आहेत.

Web Title: Suicide of a young woman due to refusal of marriage; A crime against the youth of Pune